paresh rawal 
मनोरंजन

परेश रावल यांनी सांगितला सोशल डिस्टन्सिंगचा मजेशीर अर्थ...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे..यापासून वाचण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय अमलात आणले जात आहेत..पंतप्रधान मोदी आणि देशभरातील दिग्गज कलाकार यासाठी जागरुकता करण्यासाठी पुढे येत आहेत..सेलिब्रिटी वेगवेगळ्या प्रकारे आवाहन करताना दिसून येत आहेत..कोरोना पासून वाचण्यासाठी सगळ्यात महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे सोशल डिस्टन्सिंग..पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करत म्हटलं होतं, पुढचे २१ दिवस सगळ्यांनी घराबाहेर पडणं विसरुन जायचं आहे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे..आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, जर आत्ताच कठोर पावलं उचलली गेली नाहीत तर या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो..

सोशल डिस्टन्सिंगचा अर्थ आजकाल सगळ्यांनाच कळायला लागला आहे..मात्र असं वाटतंय की अभिनेता परेश रावल अजुनही याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत..नुकतंच सोशल डिस्टन्सिंगवर परेश रावल यांनी ट्वीट केलंय जे सध्या खूपंच चर्चेत आहे..परेश रावल यांनी ट्वीट करत म्हटलंय, अखेर सोशल डिस्टन्सिंग (social distancing)चं हिंदी नामकरण मिळालं आहे..हिंदीमध्ये याला तन दुरी असं म्हणतात..परेश रावलच्या या ट्वीटला लोकांच्या मजेशीर रिएक्शन मिळत आहेत..

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात देशभरात कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यु झाला आहे आणि आणखी ४२ नवीन रुग्ण समोर आले आहेत..आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचीव लव अग्रवाल यांनी याबाबत अधिक माहिती देत म्हटलंय की देशभरात कोरोनामुळे बाधित झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे...आताचा रुग्णांचा आकडा ६४९ एवढा झाला आहे..त्यांनी म्हटलंय की कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या नक्कीच वाढतेय मात्र एक चांगली गोष्ट आहे की हा दर स्थिर आहे..

paresh rawal discovers the hindi meaning of social distancing tweeted information  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT