Paresh Rawal  
मनोरंजन

निधनाच्या अफवांवर परेश रावल यांचं मजेशीर उत्तर

परेश रावल यांचं शुक्रवारी सकाळी ७ वाजता निधन झाल्याचं एका युजरने ट्विट केलं.

स्वाती वेमूल

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते परेश रावल Paresh Rawal यांच्या निधनाची अफवा Paresh Rawal death hoax शुक्रवारी सोशल मीडियावर पसरली होती. या अफवांवर ट्विट करत परेश रावल यांनी त्यांच्याच अंदाजात मजेशीर उत्तर दिलं. सध्या कोरोना काळात अनेक सेलिब्रिटींच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. याआधी मुकेश खन्ना, मिनाक्षी शेषाद्री, तबस्सुम, गायक लकी अली यांच्याही निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. (Paresh Rawal responds to his death hoax with a witty tweet)

अफवांवर परेश रावल यांचं उत्तर-

एका ट्विटर युजरने परेश रावल यांचं सकाळी ७ वाजता निधन झाल्याचं ट्विट केलं. याच ट्विटला उत्तर देत परेश रावल म्हणाले, 'गैरसमज झाल्यामुळे माफी मागतो, कारण मी आज सकाळी ७ वाजल्यानंतरही झोपलो होतो.' निधनाच्या अफवा पसरवणाऱ्या युजरवर अनेकांनी टीका केली. तर काहींनी परेश रावल यांच्या उत्तरावर त्यांच्याच चित्रपटांतील संवाद वापरत मजेशीर मीम्ससुद्धा पोस्ट केले.

परेश रावल यांनी मार्च महिन्यात कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला होता. मात्र लस घेतल्यानंतर १७ दिवसांतच त्यांना कोरोनाची लागण झाली.

याआधी 'शक्तीमान'ची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनी निधनाच्या अफवांवर संताप व्यक्त केला होता. 'अफवा पसरवणाऱ्यांना पकडून मारलं पाहिजे', अशा शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला. सध्या कोरोनामुळे सर्वत्र चिंतेचं आणि काळजीचं वातावरण आहे. अशातच अनेक दिग्गजांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT