Parineet-Raghav Engagement:  Esakal
मनोरंजन

Parineeti Raghav Wedding: राजकारण अन् मनोरंजन हे नातच जुनं! केवळ राघव- परिचं नव्हे तर 'हे' देखील आहेत लिस्टमध्ये..

Vaishali Patil

Parineeti Raghav Wedding: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चढ्ढा यांच्या लग्नाचे आयोजन राजस्थानमधील उदयपूर येथे होणार आहे. परिणीती आणि राघव राज्यातील लीला पॅलेस हॉटेलमध्ये लग्न करणार आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे 24 सप्टेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. परिणीती आणि राघवसोबतच त्यांच्या नातेवाईकांव्यतिरिक्त काही जवळचे मित्रही उदयपूर येथे पोहोचले आहेत.

त्यानंतरही दोघे बऱ्याचवेळा एकत्र दिसले. परिणीती आणि राघव यांनी लंडन स्कूलमधून एकत्र शिक्षण घेतले आहे. ते आधीपासूनच एकमेंकाना ओळखतात.

परिणीती आणि राघव चढ्ढाने 13 मे रोजी दिल्लीत एंगेजमेंट केली होती. या सोहळ्यावेळी फक्त त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शन सुरु झाले आहेत. तर 24 सप्टेंबरला त्यांचा शाही विवाहसोहळा होणार आहे.

मात्र राजकारणी आणि मनोरंजन विश्व याचे संबध हे खुप जुणे आहेत. राजकारण्यांच्या प्रेमात पडण्याची बॉलिवूडची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अभिनेत्रींनी राजकारण्याशी लग्नही केले आहे. याआधीही अभिनेत्री राजकिय नेत्याच्या प्रेमात पडलेल्या आहेत.

Swara Bhaskar-Fahad Ahmad

त्याचवेळी अभिनेत्री स्वरा भास्करनेही समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या प्रेमात पडली. तिने याच वर्षी समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदशी लग्न केले. कोर्ट मॅरेजनंतर दोघांनी हिंदू आणि मुस्लिम रितीरिवाजानुसार पहिले लग्न केले.

त्याच्या लग्नाच्या बातम्याही खुप चर्चेत होत्या. दोघांच्या लव्हस्टोरी बद्दल सांगयचं झालं तर स्वरा आणि फहाद एका प्रोटेस्ट दरम्यान भेटले होते.

यानंतर गप्पां आणि नंतर दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. सुरुवातीला स्वरा फहादला फक्त मित्र म्हणायची, पण 6 जानेवारीला दोघांनी लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

Ayesha Takia -Farhan Azmi,

टार्झन द वंडर कारमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आयशा टाकिया हिनेही एका राजकारण्याच्या मुलाशी लग्न केले आहे. आयशाने देखील समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी याला दिले होते. दोघांनी 2009 मध्ये लग्न केले.

Navneet Kaur-Ravi Rana

नवनीत कौर, तेलगू फिल्म इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय चेहरा आहे. त्यांनी 2011 मध्ये आमदार रवी राणा यांच्यासोबत सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केलं. त्यापूर्वी त्यांनी अभिनयातून ब्रेक घेतला. या जोडप्याला दोन मुले आहेत.

Radhika Kumaraswamy - HD Kumaraswamy

सँडलवुड स्टार राधिका कुमारस्वामी जी टॉलीवूडमध्ये कुट्टी राधिका म्हणूनही ओळखले जाते तिने 2006 मध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्याशी विवाह केला. त्यांना शमिका नावाची मुलगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Gains Momentum : मॉन्सूनने पुन्हा घेतली गती; अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात दाखल; हवामान विभागाची माहिती

इबोलाचं संकट! विमानतळापासून हॉस्पिटलपर्यंत तयार रहा, केंद्राचे राज्यांना निर्देश

Rajya Sabha polls: राज्यसभेत ‘क्रॉस वोटिंग’ची चर्चा; फक्त काही आमदार बदलू शकतात सगळं चित्र; कोणते आमदार बदलणार खेळ?

Kolhapur Amba Ghat Closed : कोल्हापुरातून कोकणात जाणारा आणखी एक मार्ग राहणार बंद, आंबा घाटात गॅस टँकर पलटला

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

SCROLL FOR NEXT