Parineeti Chopra-Raghav Chadha sakal
मनोरंजन

Parineeti Chopra-Raghav Chadha: किती दिवस लपवणार... परिणीती आणि राघव चड्ढा यांचे रोमॅंटिक फोटो व्हायरल

क्रिकेटचा आनंद घेतना राघव चड्ढा यांच्या खांद्यावर डोकं ठेवताना दिसली परिणीती...

Aishwarya Musale

एकीकडे परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या चर्चा जोरात सुरू असताना, दोघेही मोहालीत एकत्र क्रिकेट मॅच एन्जॉय करताना दिसले.

गंमत म्हणजे मोहालीच्या स्टेडियममध्ये परिणीती चोप्राला पाहून चाहत्यांनी 'परिणिती भाभी' जिंदाबादच्या घोषणा दिल्या. फॅन्सनी अचानक दिलेल्या घोषणा बघून परिणीती आणि राघव दोघेही चकित झाले.

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा 'परिणिती भाभी जिंदाबाद'चे नारे ऐकून आपले हसू आवरू शकत नाहीत. हे ऐकून परिणीती तिच्या डोक्यावर हात मारते.

आता लोकांनीही या व्हिडिओचा खूप आनंद घेतला आहे. एकुणच MI vs PBKS या दोघांच्या मॅचपेक्षा राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांची हवा होती.

परिणीती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती, तर राघव चढ्ढा निळ्या शर्ट आणि पॅन्टमध्ये दिसले. आयपीएल मॅचदरम्यान दोघांमधील अप्रतिम बाँडिंग पाहायला मिळाली. फोटोंमध्ये दोघेही मॅच एन्जॉय करताना दिसत आहेत, तर काही फोटोंमध्ये परीने राघव यांच्या खांद्यावर डोके ठेवलं आहे. यापैकी एका फोटोमध्ये चाहत्यांना परिणीतीची अंगठी देखील दिसली.

यापूर्वी ही जोडी लंचवर एकत्र दिसली होती. यादरम्यानही परिणीती आणि राघव चढ्ढा मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाले.

Parineeti Chopra and Raghav Chadha

रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघवची 13 मे रोजी दिल्लीत एंगेजमेंट होणार आहे. त्याचवेळी, या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या बातम्याही येत आहेत.

अशी बातमी आहे की तिची बहीण प्रियांका चोप्रा देखील परिणीती चोप्राच्या लग्नात तिच्या कुटुंबासह उपस्थित राहू शकते. अभिनेत्रीच्या बाजूने एंगेजमेंटबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT