Parineeti-Raghav Wedding Parineeti Chopra Bride In Manish Malhotra Lehenga And Jewellery took 2500 hours to create post Esakal
मनोरंजन

Parineeti Chopra Wedding Lehenga: 'परि का लेहेंगा सबसे मेहेंगा' बनवायला लागले तब्बल साडेतीन महिने

Vaishali Patil

Parineeti Chopra Wedding Lehenga: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा 24 सप्टेंबर रोजी पंजाबी रितीरिवाजांनुसार विवाहबद्ध झाले. गेल्या बऱ्याच दिवासांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा होती. त्यांनी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये लग्न केले. तिच्या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र दिसले होते.

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढाच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटोत परीने पेस्टल रंगाचा लेहेंगा आणि ज्वेलरी घातली आहे.

या लूकमध्ये ती कमालिची सुंदर दिसत आहे. तर राघवने ऑफ व्हाइट कलरची शेरवानी घातली होती. या फोटोच्या कॅप्शनमध्ये परिने राघवसोबतची तिची लव्हस्टोरी देखील शेयर केली आहे.

परिणीतीचा हा लेहेंगा सुप्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा डिझाइन केला आहे. आता मनीष मल्होत्रा यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेयर करत त्याने या लेहेंग्यांतील काही खास पोस्ट केली आहे.

आता त्यांनी या पोस्टमध्ये खुलासा केला की, परिणीतीने लग्नात परिधान केलेला लेहेंगा बनवण्यासाठी त्यांनी सुमारे 2,500 तास लागले. 2,500 तास म्हणजे जवळपास साडेतीन महिने कारागिरांनी त्या लेहेंग्यावर मेहनत घेतीली. परिच्या लेहेंग्यावर पुर्ण एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आले आहे.

मनीषने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर परिणीती आणि राघवच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. 2,500 तास मेहनत घेत कारागिरांनी या लेहेंग्यावर पूर्णपणे हाताने भरतकाम केले आहे. तर परिणीतीच्या लग्नातील लेहेंग्याच्या ब्लाउजने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यावर मोठ्या अक्षरात राघवचे नाव लिहिण्यात आले आहे.

तिच्या लेहेंग्याचा स्कर्ट पॅनल पॅटर्नचा होता. त्यावर अतिशय किचकट काम करण्यात आले. जरी परिणिती बर्‍याचदा बोल्ड नेकलाइन्सच्या कपड्यांमध्ये दिसत असली तरी, तिच्या लग्नासाठी तिने अतिशय डीसेंट कट ब्लाउज शिवला होता.

हाफ स्लीव्ह ब्लाउजला यू-कट नेकलाइन मध्ये ती कमाल दिसत होती. यात सोन्याचा धागा वापरण्यात आला होता. नक्कीच परिणीतीच्या लग्नाचा खास लेहेंगा तयार करण्यासाठी मनीष मल्होत्राच्या संपुर्ण टिमनं खुपच मेहनत घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT