Parineeti chopra cutely kisses hubby Raghav on mandap, says 'behave' to friend  SAKAL
मनोरंजन

Parineeti - Raghav Wedding: तू गप्प बस..! परिणीती भर मंडपातच मित्रांवर ओरडली, असं काय घडलं? व्हिडीओ आला समोर

परिणीती भर लग्नमंडपात तिच्या मित्रांना ओरडताना दिसली

Devendra Jadhav

Parineeti - Raghav Wedding: परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा या दोघांनी २४ सप्टेंबरला एकमेकांशी लग्न केलं. उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये थाटामाटात या दोघांनी लग्नगाठ बांधली.

परिणीती - राघव यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. अशातच परिणीती - राघवच्या लग्नाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. यात परिणीती तिच्या मित्रांना ओरडताना दिसतेय.

(Parineeti chopra cutely kisses hubby Raghav on mandap, says 'behave' to friend)

परि तिच्या मित्रांवर का ओरडली?

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढाचा एक व्हिडीओ समोर येतोय. परिणीती - राघवच्या नवीन व्हिडिओमध्ये परिणीती आणि राघव लग्नमंडपात पोज देताना दिसत आहेत.

फोटोसाठी पोझ देताना समोरची माणसं हसताना दिसत आहेत. परिणीतीही खेळकर होऊन राघवचा हात धरते. ती त्याच्या गालावर किस करते. "काय करायचंय पुढे?" असं विचारताच तिचे मित्र समोर काहीतरी हावभाव करत असतील. ती तिच्या मित्रांना शांत बसा असं म्हणत त्यांच्यावर क्यूट ओरडताना दिसते.

लग्नानंतर लाडकी परी सासरी

लग्नानंतर परिणीती चोप्रा पती राघव चढ्ढासोबत दिल्लीतील तिच्या सासरच्या घरी आली आहे. येथे तिचे स्वागत करण्यात आले. पिवळा सूट, गुलाबी बांगड्या, सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र घातलेली परि नववधूच्या लूकमध्ये खुप सुंदर दिसत होती.

आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नववधू आणि वर म्हणजेच राघव आणि परिचं त्यांच्या दिल्लीतील घरी जंगी स्वागत करण्यात आलं.

ढोल - ताशांच्या गजरात परीचं स्वागत

परिणीती - राघवची गाडी दिल्लीतील घरी गेटवर पोहचण्यापुर्वीच गेटवर ढोल वाजवले जात होते. परिणीती - राघव लग्नानंतर त्यांच्या घरी आले. यावेळी राघवचे घर सजवलेलं दिसत असुन दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. सासरच्या मंडळींनी त्याची सून परिणीतीचे जोरदार स्वागत केले. तर एक व्हिडिओत राघव देखील ढोलच्या तालावर नाचाताना दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT