Parineeti-Raghav Chadha Wedding  Esakal
मनोरंजन

Parineeti-Raghav: सासरी जाण्यापुर्वीचं परी लागली रडायला! फोटो व्हायरल

Vaishali Patil

Parineeti Shares Latest Photos: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने 13 मे रोजी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये तिचा प्रियकर राजकारणी राघव चड्ढासोबत एंगेजमेंट केली. एंगेजमेंटनंतर अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा त्यांच्या एंगेजमेंटचे कधीही न पाहिलेले फोटो शेअर करत आहेत.

एंगेजमेंट सोहळ्याच्या 10 दिवसांनंतर अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी पुन्हा एकदा त्यांच्या एंगेजमेंटचे न पाहिलेले फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोन्ही स्टार्स कधी हसताना तर कधी भावूक होताना दिसले.

दोघांची ही फोटोंना चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. या फोटोत दोघेही एकमेकांच्या मिठीत आहेत. जणु ती नव्या आयुष्याची स्वप्ने पाहत असावी. त्याचबरोबर एका फोटोत अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या होणाऱ्या सासूवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसली. या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

तर दुसऱ्या फोटोत प्रियांका चोप्रा देखील तिच्या लहान बहिणीच्या पतीचं कुटुंबात स्वागत करताना दिसली. या फोटोमध्ये ती राघव चढ्ढाच्या कपाळावर टिका लावताना दिसत आहे. यातील एका फोटोने चाहत्यांचे खास लक्ष वेधुन घेतलं आहे. या फोटोत परिणीतीच्या डोळ्यात पाणी आहे. ती राघवसोबत दिसत आहे. या आनंदाच्या क्षणात अभिनेत्री खूपच भावूक दिसत होती.

परिणीतीने तिच्या शेअर केलेल्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिची लव्हस्टोरीही सांगतिली आहे. ती यात म्हणते की, “नाश्ता केला आणि मला माहित आहे की मला तो भेटला आहे. सर्वात अद्भुत माणूस, शांत आणि प्रेरणादायक असेल.

त्यांचा पाठिंबा, विनोद, बुद्धी आणि मैत्री हा निखळ आनंद आहे. तो माझे घर आहे. आमची एंगेजमेंट पार्टी एक स्वप्न जगण्यासारखी होती . प्रेम, हशा, भावना आणि भरपूर नृत्यामधील सुंदरपणे फुलणारं एक स्वप्न!

आम्ही आमच्या प्रियजनांना मिठी मारली आणि त्यांच्यासोबत आनंद साजरा केला. भावना ओसंडून वाहत होत्या.

एका लहान मुलीला राजकन्येच्या कथेचे वेड लागलेले असताना, माझी परीकथा कशी सुरू होईल याची मी कल्पना केली. आता ते पूर्ण झाले आहे, हे माझ्या कल्पनेपेक्षा चांगले आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT