Parineeti Chopra On Her Wedding  esakal
मनोरंजन

Parineeti Chopra : 'अजून लग्न झालेलं नाही', परिणीती असं का म्हणतेय?

आपचे राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबत परिणीतीचा साखरपुडा झाला होता. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

Parineeti Chopra On Her Wedding : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा ही तिच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांसाठी आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिचा साखरपुडा.

आपचे राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबत परिणीतीचा साखरपुडा झाला होता. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटी आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्या दोघांच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. राघव आणि परिणीतीचे फोटो यापूर्वी व्हायरल झाले होते. तेव्हापासून त्यांच्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात होत्या.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

परिणीतीचा साखरपुडा झाला आणि त्यानंतर लग्न कधी असे प्रश्न विचारून तिला पापाराझ्झींनी बेजार केल्याचे दिसून आले. त्यांना आपण लवकरच तुम्हाला लग्नाची तारीख सांगू असे तिनं म्हटले होते. मात्र ऐकतील ते पापाराझ्झी कसले. त्यांनी एका कार्यक्रमामध्ये परिणीतीला लग्नाची विचारणा केली तेव्हा तिनं त्यांना पुन्हा हसून परतवून लावले. आता एका व्हिडिओनं मात्र नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिणीती आणि राघव चढ्ढा हे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचे झाले असे की, एका कार्यक्रमातून परिणीती फोटोग्राफर्सला समोर गेल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी दिला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी परिणीती तुझं काय चाललं आहे, तू आनंदात आहे की नाही...असा प्रश्न विचारला होता. त्यावर तिनं दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

परिणीती पापाराझ्झींच्या त्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले आहे की, तुम्ही मला माझ्या आयुष्यामध्ये नवीन काय चालले आहे, मी आनंदी आहे ना असे विचारता आहात, माझे लग्न झाल्यानंतर मी आनंदी आहे की नाही हे विचारता आहात, पण अजून माझे लग्न झालेले नाही त्यामुळे अजून मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. असा प्रश्न परिणीतीनं पापाराझ्झींना केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवाजी पार्कसाठी ठाकरे बंधू अन् भाजप-शिंदेसेनेचाही अर्ज, एकच तारखा; कुणाला मिळणार परवानगी?

Crime News: काकाच्या हत्येचा बदला? नमाजानंतर चाकूहल्ला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल ठार, जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट!

Latest Marathi News Live Update : राज्यात ढगाळ हवामान, किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता

भाविकांसाठी बातमी! विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन तीन दिवस राहणार बंद; मूर्तीवर लवकरच हाेणार रासायनिक प्रक्रिया..

BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

SCROLL FOR NEXT