Raghav Chaddha Parineeti Chopra Wedding Sakal
मनोरंजन

Parineeti-Raghav Wedding: नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा...

परिणिती चोप्राने आपल्या लग्नाचा लूक शेअर केला आहे.

वैष्णवी कारंजकर

बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा हे नुकतेच लग्नबंधनात अडकले. हा लग्न सोहळा उदयपूरच्या लिली पॅलेस इथे पार पडला. काल रात्रीच या जोडप्याचा लग्नानंतरचा लूक समोर आला होता. यामध्ये हे नवविवाहित जोडपं खूपच छान दिसत होतं.

आता परिणिती चोप्राने आपला लग्नाचा लूकही शेअर केला आहे. तिचे चाहते तिच्या लग्नाच्या फोटोची आतुरतेने वाट पाहत होते. आता परिणितीने आपल्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या साध्या लूकमुळे ती सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे.

परिणिती चोप्राने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत. या दोघांच्या लग्नविधीदरम्यानचे हे फोटो आहेत. यामध्ये परिणितीने अगदी साधा लूक केला आहे. परिणितीने बेज रंगाचा घागरा परिधान केला आहे. यावर तिने फिकट हिरव्या, पाचू रंगाचे दागिने घातलेले आहेत. परिणितीचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा या दोघांनीही फिकट रंगाचे कपडे परिधान केले आहेत. राघवने क्रिम कलरचा कुर्ता पायजमा आणि फेटा बांधला आहे. तर परिणितीनेही तशाच फक्त थोड्याशा डार्क रंगाचा घागरा परिधान केला आहे. या दोघांनीही अगदी कमीत कमी मेकअप केला आहे. हलका बेस आणि स्मोकी आईज लूक केला आहे. शिवाय गालांवर अगदी थोडंसं ब्लश आणि फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक परिणितीने लावलेली आहे. परिणितीने यासोबत आपले केस मोकळे सोडले आहेत.

परिणितीचा घागरा डिझायनर मनिष मल्होत्राने तयार केलेला आहे. हा घागरा तयार कऱण्यासाठी त्याला जवळपास २५०० तास लागले आहेत. यावर हँडवर्क कऱण्यासाठी जुन्या सोन्याच्या तारांचा वापर करण्यात आला आहे. तसंच परिणितीच्या ओढणीवर राघव असं होणाऱ्या पतीचं नावही लिहिलेलं आहे. हा फोटो सध्या व्हायरल होत आहे आणि चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरच्या फिंगरप्रिंट बघायच्या आहेत : राज ठाकरे

Ahilyadevi Holkar Loan Waiver : कर्जमाफी अन् 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान! 41 हजार 552 शेतकऱ्यांचे खाते होणार नील; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

KDMC: परवानगी १४ मजल्यांची, बांधले २१ इमले; सात मजले बेकायदा, बिल्डरसह केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे सहा दरवाजे ६ फूटांनी उचलले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; ३३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Ratnagiri Tourism : मिनी महाबळेश्वर' माचाळमधील प्रसिद्ध 'भिषाचा कडा' बनतोय धोकादायक! 'उलट्या धबधब्यावर' पर्यटकांचा जीव धोक्यात; तातडीने सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT