Raghav Chadha-Parineeti Chopra  esakal
मनोरंजन

Raghav Chadha-Parineeti Chopra : परिणीतीचा होणारा नवरा एवढा गरीब कसा? त्याच्याकडे फक्त...

सोशल मीडियावर तर परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या रिलेशनशिपची मोठी चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्याच जवळच्या एका व्यक्तीनं तर ते लग्न कऱणार असल्याचे म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Raghav Chadha Parineeti Chopra News : बॉलीवूडची अभिनेत्री परिणीती चोप्रा हिची दुसरी ओळख म्हणजे ती हॉलीवूडची अभिनेत्री प्रियंका चोप्राची सख्खी बहिण. गेल्या काही दिवसांपासून परिणीती ही तिच्या रिलेशनशिपवरुन चर्चेत आली आहे. ती आप नेत्याच्या प्रेमात पडली आहे. तिचा होणारा पती हा आपचा मोठा नेता असून त्याचे नाव राघव चढ्ढा असे आहे.

सोशल मीडियावर तर परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या रिलेशनशिपची मोठी चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्याच जवळच्या एका व्यक्तीनं तर ते लग्न कऱणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे चाहत्यांनी परिणीतीवर कौतूकाचा वर्षाव सुरु केला आहे. बऱ्याच दिवसांपासून तिच्या अफेयर आणि डेटिंगच्या चर्चांना यानिमित्तानं पुर्णविराम लागल्याचे बोलले जात आहे. तिचा होणारा पती हा राजकीय क्षेत्रातील मोठं नाव असल्यानं त्यावरुन वेगळ्याच चर्चा होत आहे.

Also Read - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करनं समाजवादी पार्टीच्या एका नेत्यासोबत संसार थाटला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुरुवातीला कोर्ट मॅरेज करणाऱ्या स्वरानं पुन्हा पारंपारिक पद्धतीनं विवाह करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आता परिणीतीच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. यासगळ्यात तिचा होणारा नवरा कोण आहे, त्याची प्रॉपर्टी किती याविषयी माहिती सर्च केली जात आहे.

Raghav Chadha Parineeti Chopra News

आपचे खासदार राघव चढ्ढा हा पंजाबचा आहे. त्यानं जेव्हा राज्यसभेसाठी फॉर्म भरला होता त्यावेळी निवडणूक आयोगाकडे जी कागदपत्रं दिली होती त्यामध्ये आपल्याकडे ३७ लाख रुपयांची प्रॉपर्टी असल्याचे सांगितले होते. तसेच एकही रुपयाचे कर्ज नसल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. त्यावेळी राघवन म्हटलं होतं की, आपल्याकडे ३६ लाख ९९ हजार ४७१ रुपयांची संपत्ती आहे. एवढचं नाहीतर त्याच्याकडे स्वताचे घर नाही की स्वताच्या नावावर जमीन नाही.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राघवकडे त्याच्या नावावर फक्त मारुती स्विफ्ट नावाची कार आहे. त्यानं २०१९ चे ते मॉडेल असून त्याची किंमत १ लाख ३२ हजार एवढी आहे. याशिवाय त्याच्याकडे ९ तोळे सोने असून त्याची किंमत ४ लाख ९५ हजार एवढी आहे. अर्थात हे सगळे २०१९ मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रात राघवनं आपल्या संपत्तीविषयीची माहिती दिलेली आहे. आता त्यात वाढ झाली असेल असे म्हणायला हरकत नाही.

११ नोव्हेंबर १९८८ मध्ये दिल्लीमध्ये जन्म झालेल्या राघवचं शिक्षण हे दिल्लीतील मॉडर्न स्कुलमध्ये झालं. त्यानंतर तो दिल्ली विद्यापीठातून कॉमर्स शाखेतून उत्तीर्ण झाला. पुढील शिक्षणासाठी तो लंडनला गेला. तिथं त्यानं लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये पदवी घेतली. यानंतर तो सीए झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT