parineeti chopra and raghav chadha  Sakal
मनोरंजन

Parineeti-Raghav: परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा या आठवड्यात करणार एंगेजमेंट! दिल्लीत तयारी झाली सुरू

परिणीती आणि राघव चढ्ढा त्यांच्या डेटिंगच्या अफवांमुळे चर्चेत आहेत. त्याचवेळी हे कपल आता एंगेजमेंट करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा काही दिवसांपासून चर्चेत आहेत. खरे तर दोघेही नुकतेच मुंबईत परत एकदा स्पॉट झाले होते. आधी ते डिनरसाठी एकत्र स्पॉट झाले आणि दुसऱ्या दिवशी हे जोडपे लंचसाठी एकत्र दिसले.

यानंतर त्यांच्या डेटिंग रूमवर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला गेला. गायक-अभिनेता हार्डी संधूनेही परिणीती-राघवच्या नात्याला होकार दिला होता. आता हे जोडपे एंगेजमेंट करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, परिणीती आणि राघव लवकरच एंगेजमेंट करणार आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, अभिनेत्री एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एका इंटिमेट फंक्शनमध्ये राघवशी एंगेजमेंट करणार आहे. जरी त्यांच्यापैकी कोणीही किंवा त्यांच्या कुटुंबाने ऑफिशियली कंफर्मेशन दिले नाही.

रिपोर्ट्सनुसार, सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, “परिणिती-राघव त्यांच्या एंगेजमेंटच्या तयारीत पूर्णपणे गुंतले आहेत. पुढच्या आठवड्यात त्यांची दिल्लीत एंगेजमेंट होणार आहे".

एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्ट्सनुसार, सूत्राने सांगितले की, “परिणिती-राघवचा एंगेजमेंट सोहळा जवळचा असेल. दोघांच्या खास दिवशी त्यांच्या सर्कलमधील कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र असतील.

परिणीतीची चुलत बहीण प्रियांका चोप्रा देखील तिचा पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसोबत भारतात आहे, त्यामुळे ती परिणीती-राघवच्या एंगेजमेंटला उपस्थित राहू शकते. या सोहळ्यासाठी परिणीतीची चुलत बहीण मीरा कपूरही दिल्लीत पोहोचली आहे.

परिणीती आणि राघवही आदल्या दिवशी विमानतळावर स्पॉट झाले होते. यादरम्यान परिणीती ऑल-ब्लॅक लूकमध्ये दिसली, तर राघवने बेज रंगाचा शर्ट घातला होता. हे कपल नवी दिल्लीत एंगेजमेंट करणार असल्याच्याही अफवा आहेत.

या सगळ्या दरम्यान परिणीतीने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने 'चश्मीश' असे लिहिले आहे. त्यानंतर अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट करत राघवने हेच नाव ठेवलं आहे का, असा प्रश्न केला.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर परिणीतीचा शेवटचा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्यासोबत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. आणि आता परिणीती 'चमकिला' आणि 'कॅप्सूल गिल' या खऱ्या आयुष्यावरील कथांवर आधारित दोन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devkund Waterfall: देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाले; सोमवारी सकाळी शोधकार्य सुरु होणार

Abhishek Sharma: भारत हरला, पण अभिषेक शर्माने रचला इतिहास! 'हा' खास विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

SCROLL FOR NEXT