Parineeti Chopra and Raghav Chadha engagement 
मनोरंजन

Parineeti-Raghav Engagement : शेवटी साखरपुड्याचा दिवस उजाडला! डेटिंग संपलं

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि तिचा बॉयफ्रेंड राघव चढ्ढा यांच्या नात्यावर अखेर शिक्कामोर्तब होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Parineeti Chopra and Raghav Chadha engagement : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि तिचा बॉयफ्रेंड राघव चढ्ढा यांच्या नात्यावर अखेर शिक्कामोर्तब होणार आहे. आज त्यांचा दिल्लीमध्ये साखरपुडा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर देखील हे दोन्ही सेलिब्रेटी चर्चेत असल्याचे दिसून आले आहे.

बऱ्याच दिवसांपासून या दोन्ही सेलिब्रेटींच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. राघवपेक्षा परिणीतीनं सोशल मीडियातून चाहत्यांना याविषयी अनेकदा माहिती दिली होती. अप्रत्यक्षपणे तिनं आपल्या नात्याविषयी उलगडाही केला होता. आम आदमी पक्षाचे नेते म्हणून राघव चढ्ढा यांची वेगळी ओळख आहे. दिल्लीतील कपूरथाला हाऊसमध्ये साखरपुड्याचा सोहळा पार पडणार आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सोशल मीडियावर व्हायरल झाले्या त्या व्हिडिओमध्ये ज्याठिकाणी तो सोहळा पार पडणार आहे त्याविषयीची माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि बॉलीवूडमधील सेलिब्रेटी हजर राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परिणीची वेशभूषा हा देखील ट्रेडिंगचा विषय असून ती प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रानं केली आहे.

सध्या परिणीती तिच्या साखरपुडयाच्या तयारीत व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. बऱ्याच दिवसांपासून राघव चढ्ढा आणि परिणीती यांचे फोटो व्हायरल होत होते. त्यावर नेटकऱ्यांच्या आलेल्या कमेंट्सही भन्नाट होत्या. त्यांचे लग्न होणार आहे, ते एकमेकांना डेट करत आहेत. बॉलीवूडमध्ये आणखी गुड न्युज समोर येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परिणीतीनं याविषयी अधिक माहिती सोशल मीडियावर शेयर केली होती.

परिणीतीच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तिचा उंचाई नावाचा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. त्यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, अनुपम खेर, डॅनी, नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मागील काही दिवसांपूर्वी परिणीतीच्या साखरपुड्याविषयी चर्चा रंगली होती. आज तो सोहळा पार पडणार असून त्याला बॉलीवूडचे काही सेलिब्रेटी उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT