Parineeti Chopra  Instagram
मनोरंजन

परिणीतीने सांगितला ऑनस्क्रीन इंटिमेट सीनचा अनुभव

"अशा सीन्समध्ये जेव्हा दिग्दर्शक कट म्हणतो, तेव्हा.."

स्वाती वेमूल

करिअरमधील नकारात्मक काळ अनुभवल्यानंतर आता अभिनेत्री परिणीती चोप्राने Parineeti Chopra एकामागोमाग एक तीन यशस्वी चित्रपट दिले आहेत. 'संदीप और पिंकी फरार', 'सायना' आणि 'द गर्ल ऑन द ट्रेन' या चित्रपटांमधील तिच्या कामगिरीची प्रशंसा होतेय. दुसरीकडे तिने गायलेल्या 'केसरी' Kesri या चित्रपटातील गाण्याला युट्यूबवर १०० दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. हे सर्व घडण्यासाठी मी गेल्या पाच वर्षांपासून प्रतीक्षा करत होते, अशी प्रतिक्रिया परिणीतीने दिली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत परिणीतीने तिच्या करिअरविषयी, चित्रपटांविषयी बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने व्यक्त केल्या. या मुलाखतीत तिने ऑनस्क्रीन इंटिमेट सीन करतानाचाही अनुभव सांगितला. (Parineeti Chopra talks about lovemaking and kissing scenes in movies)

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत परिणीतीला विचारण्यात आले, 'एखादा रोमँटिक सीन करताना तू त्यात कधी वाहून गेलीस का?' यावर उत्तर देताना परिणीती म्हणाली, "नाही, किसिंग आणि इतर इंटिमेट सीन्स मी केले. पण अशा सीन्समध्ये जेव्हा दिग्दर्शक 'कट' म्हणतो तेव्हाच सर्वकाही संपतं. जेव्हा जेव्हा ऑनस्क्रीन इंटिमेट सीन्स असतात, तेव्हा फारच तांत्रिकदृष्ट्या विचार करून ते शूट केले जातात."

करिअरच्या सुरुवातीला परिणीतीला चांगली ओळख आणि यश मिळालं. मात्र काही काळानंतर तिला अपेक्षित चित्रपटांचे ऑफर्स येत नव्हते आणि काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. मात्र आता पुनरागमन करताना, परिणीतीने आनंद व्यक्त केला आहे. "करिअरमध्ये मी असे काही चित्रपट केले, ज्यात मला आनंद कधीच मिळाला नव्हता. अखेर मला आता माझ्या मनासारख्या भूमिका आणि चित्रपट मिळू लागले आहेत", असं ती म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT