Parineeti-Raghav Chadha Wedding Update Instagram
मनोरंजन

Parineeti-Raghav Chadha Wedding Update: साखरपुडा उरकला..आता लवकरच शुभमंगल!, होणाऱ्या नवरीनेच केला खुलासा

प्रियंका चोप्रानं दिलेल्या शुभेच्छांना उत्तर देताना परिणीती चोप्रानं आपल्या लग्नाविषयी सांगून टाकलं आहे.

प्रणाली मोरे

Parineeti-Raghav Chadha Wedding Update: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची प्रेमकहाणी सध्या फॉर्मात आहे. दोघांनी साखरपुडा करत आपल्या नात्याला जगासमोर कबूल केलं आहे. काही महिने आधी जेव्हा परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा एकत्र मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर येताना दिसले तेव्हा सगळेच हैराण झाले होते. अर्थात साखरपुडा होईपर्यंत दोघांनी आपल्या नात्याविषयी चुप्पी साधली होती. पण जगाला तोपर्यंत जे कळायचं ते कळलं होतं.

साखरपुडा तर झाला, आता परिणीती चोप्राच्या चाहत्यांना प्रतिक्षा आहे ते तिच्या लग्नाची. लग्न कधी,कोणत्या तारखेला हे जरी आतापर्यंत समोर आलेलं नसलं तरी रिपोर्ट्समध्ये सांगितलं गेलं आहे की ऑक्टोबरमध्ये परिणीती आणि राघव लग्न करू शकतात.

लग्नाची तारीख भले समोर आली नसली तरी लग्न लवकरच होईल याची माहिती स्वतः होणाऱ्या नवरीबाईंनी म्हणजेच परिणीती चोप्रानं दिली आहे. त्याचं झालं असं की परिणीती चोप्राने प्रियंकाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करत हिंट दिली आहे की लग्न लवकरच होणार आहे.

प्रियंका चोप्राने इन्स्टाग्रामवर परिणीतीच्या साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले होते. तिनं लिहिलं होतं की,''तिशा आणि राघव यांना शुभेच्छा..मी तुमच्या लग्नाची खूप आतुरतेने वाट पाहत आहे. तुम्हा दोघांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी मी खूप खूश आहे. मला संपूर्ण कुटुंबासोबत वेळ घालवून खूप छान वाटलं''.

Parineeti Chopra Reaction on Priyanka Chopra Post

प्रियंकाच्या या पोस्टवर परिणीतीनं लिहिलं,''मिमी दीदी-ब्राइडची मेड बनून दिमतीला हजर रहायची वेळ आली आहे''. यासोबतच परिणीतीनं हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा १३ मे रोजी दिल्लीत मोठा धुमधडाक्यात पार पडला. या साखरपुड्याला दिल्ली आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसोबत राजकीय नेते देखील सामिल झाले होते.

याव्यतिरिक्त अभिनेत्री परिणीतीची चुलत बहिण अभिनेत्री प्रियंका चोप्रा देखील साखरपुड्याच्या सोहळ्यात सामिल झाली होती. फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रानं देखील परिणीतीच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT