Parsi-led companies pay homage to Sam Manekshaw, will hold special screenings of Sam Bahadur movie  SAKAL
मनोरंजन

Sam Bahadur: सॅम माणेकशॉ यांना पारसी समाजाची अनोखी आदरांजली, करणार 'ही' खास गोष्ट

विकी कौशलचा सॅम बहादूर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Devendra Jadhav

Sam Bahadur Movie News: सर्वांना विकी कौशलच्या आगामी सॅम बहादूरची उत्सुकता आहे. विकी कौशलचा सॅम बहादूर सिनेमाची सर्वांना लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाच्या निमित्ताने विकी कौशल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारतेय.

विकी कौशलच्या सॅम बहादूर सिनेमाबद्दल एक अपडेट समोर येतंय. पारसी समाजाने एका अनोख्या कृतीतून फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना आदरांजली वाहिलीय.

पारसी समाजाची सॅम माणेकशॉ यांना आदरांजली

फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ हे पारशी समाजाचे होते. त्यामुळे टाटा ग्रुप, पूनावालास ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, गोदरेज ग्रुप आणि

शापूरजी पालनजी ग्रुपसह पारशी नेतृत्व असलेल्या प्रमुख कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना सॅम माणेकशॉ यांच्या सन्मानार्थ सॅम बहादूर चित्रपटाचे विशेष स्क्रिनींग आयोजित करणार आहेत. सॅम माणेकशॉ यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी असा उद्देश असणार आहे.

विकी कौशलने आर्मी ऑफीसर्ससोबत केला गोरखा डान्स

विकी कौशल सध्या सॅम बहादूरचं प्रमोशन करायला सगळीकडे फिरत आहे. यानिमित्ताने विकी लखनऊच्या आर्मी पब्लिक स्कूल मध्ये गेला होता.

त्यावेळी विकीने आर्मीसोबत खास गोरखा डान्स केला. विकीचा हा डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. विकीने त्यावेळी मिलीटरी स्कूलमधील जवानांसोबत गप्पा मारुन त्यांच्याशी संवाद साधला.

या तारखेला सॅम बहादुर येणार भेटीला

सॅम बहादुर या चित्रपटात विकी कौशल, सान्या मल्होत्रा, फातिमा साना शेख असे कलाकार झळकणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलंय.

सॅम बहादुर चित्रपट १ डिसेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये येणार आहे. त्याची टक्कर रणबीर कपूरच्या अॅनिमल सोबत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT