Parveen Babi Biopic Esakal
मनोरंजन

Parveen Babi यांचं आयुष्य आता रुपेरी पडद्यावर, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची बायोपीकसाठी लागली वर्णी

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये परवीन बाबी यांची भूमिका नेमकी कोणती अभिनेत्री साकारणार आहे याचा खुलासा होणार आहे.

प्रणाली मोरे

Parveen Babi: गेल्या काही दिवसांपासून परवीन बाबी यांच्या बायोपीकची चर्चा रंगली होती. पण यात परवीन बाबी यांची मुख्य भूमिका कोण साकारणार यावरनं अनेक अभिनेत्रींची नावं समोर येत होती. पण आता कळंतय की एका अभिनेत्रीच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे आणि ती आहे सध्या जोरदार चर्चेत असलेली उर्वशी रौतेला.

उर्वशी रौतेला कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सामिल होण्यासाठी रवाना झाली आहे. कानमध्ये ती अर्थातच ग्लॅमरस अंदाजात दिसणार आहे,तसंच तिच्याकडे कान फेस्टिव्हलमध्ये जाण्यासाठी खास कारणही आहे.

उर्वशी रौतेला लवकरच परवीन बाबीच्या बायोपीकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये परवीन बाबीच्या बायोपीकचा एक फोटो लॉंचचा इव्हेंट देखील आहे. कान फिल्म फेस्टिव्हल उर्वशी रौतेलासाठी यंदा खास औचित्य घेऊन आला आहे. काही दिवसांपूर्वीच तिची वेबसिरीज 'इन्स्पेक्टर अविनाश' चा ट्रेलर देखील रिलीज झाला.(Parveen Babi Biopic this actress play lead role)

उर्वशी रौतेला बॉलीवूड अभिनेत्री परवीन बाबीवर बनणाऱ्या बायोपीकच्या फोटो लॉंच कार्यक्रमात सहभागी होणार आहे. परवीन बाबी यांची भूमिका उर्वशी रौतेला साकारत आहे ही बातमी जेव्हापासून समोर आली आहे त्यानंतर तिचे चाहते तिला परवीन बाबी यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.

कान फिल्म फेस्टिलव्हलमध्ये फोटोकॉल लॉंच हा उर्वशी रौतेलाला आपल्या व्यक्तिरेखेला सादर करण्याचा आणि प्रेक्षकांमध्ये या बहुप्रतिक्षित सिनेमाची एक झलक दाखवण्यासाठी एकदम योग्य मंच आहे.

याविषयी उर्वशी रौतेला म्हणाली,''हो,तुम्ही बरोबर ऐकलंत. मी परवीन बाबी यांच्यावर बनणारा बायोपीक साइन केला आहे.आणि त्यात मीच परवीन बाबी साकारत आहे, मी खूप खूश आहे. कान फिल्म फेस्टिव्हलची आभारी आहे, कारण हा जगातील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलपैकी एक आहे आणि माझ्या करिअरमधील हा एक महत्त्वाचा माइलस्टोन आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT