Pasoori Rcreation Arijit Singh Kathik Aryan esakal
मनोरंजन

Arijeet Pasoori Recreation : 'पसूरी'ला अरिजीतचा 'सूर' म्हटल्यावर काय बोलायचं?

भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांमध्ये पसूरी गाण्याचा समावेश होतो. युट्युबवर सर्वाधिक व्ह्युज मिळवणाऱ्या गाण्यांमध्ये पसूरीचा क्रमांक वरचा आहे.

युगंधर ताजणे

Pasoori Rcreation Arijit Singh Kathik Aryan : युट्यूबवर ज्या गाण्यानं पाचशे मिलियनपेक्षाही जास्त व्ह्युज मिळवले आहेत त्या पसूरी गाण्याची क्रेझ काही वेगळीच आहे. त्या गाण्याला नेटकऱ्यांचा प्रतिसाद प्रचंड आहे. कोक स्टूडिओच्यावतीनं निर्मिती करण्यात आलेल्या या गाण्याची क्रेझ गेल्या वर्षांपासून आहे.

भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांमध्ये पसूरी गाण्याचा समावेश होतो. युट्युबवर सर्वाधिक व्ह्युज मिळवणाऱ्या गाण्यांमध्ये पसूरीचा क्रमांक वरचा आहे. आता हे गाणं पुन्हा चर्चेत आलं आहे. त्याचे कारण त्या गाण्याचे रिक्रिएशन. प्रसिद्ध गायक अरिजित सिंगनं ते गाणं गायलं आहे. अवघ्या तासाभरात त्या गाण्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड असल्याचे दिसून आले आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आणि गाण्यांनी आधीच लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता चाहत्यांची आणि प्रेक्षकांची क्रेझ एका वेगळ्या पातळीवर नेण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाचा 'पसूरी नू' हा लेटेस्ट ट्रॅक अरिजित सिंगच्या जादुई आवाजात रिलिज केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. गाण्याच्या मेकर्सनं म्हटलं आहे की, हा चित्रपट म्यूजिकल ब्लॉकबस्टर आहे. शिवाय, कार्तिक आर्यन आणि अरिजित सिंग पुन्हा एकदा एकत्र येऊन ही कलाकृती पुन्हा तयार करणं ही आनंदाची भावना आहे. अरिजितच्या आवाजातील हे गाणं खास आहे.

चित्रपटातील हे गाणे अरिजित सिंग आणि तुलसी कुमार यांनी गायले आहे. याचे संगीत रोचक कोहली आणि अली सेठी यांनी दिले आहे. गाण्याचे बोल गुरप्रीत सैनी आणि अली सेठी यांचे आहेत. 'सत्यप्रेम की कथा'चे संगीत सध्या चर्चेचा विषय आहे. 'नसीब से', 'आज के बाद', 'गुज्जू पताका' आणि 'सुन सजनी' यांसारखी याआधी रिलीज झालेली गाणी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे.

'सत्यप्रेम की कथा' हे एनजीई आणि नमाह पिक्चर्सची निर्मिती आहे. विशेष म्हणजे, किशोर अरोरा आणि दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्यासह साजिद नाडियादवाला आणि शरीन मंत्री केडिया यांना यापूर्वी त्यांच्या कलाकृतीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. 'सत्यप्रेम की कथा' 29 जून 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT