Akhilesh Yadav  On The Success Of Pathan
Akhilesh Yadav On The Success Of Pathan Esakal
मनोरंजन

Akhilesh Yadav On Pathaan: अखिलेश यादव यांनाही 'पठाण'चं कौतुक, 'हा चित्रपट तर..'

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही महिन्यापासून पठाण या चित्रपटाची खुपच चर्चा रंगली. रिलिजपुर्वीचा हा चित्रपट इतका वादात अडकला की हा चित्रपट आता आपटणार असचं काहीसं चित्र निर्माण झालं. दिपिकानं भगवी बिकिनी घातलीच का हे यावरुन तुफान वाद झाला. अनेक राजकारण्यांनी या विषयी प्रतिक्रीया दिली.

(Akhilesh Yadav On The Success Of Pathan)

मात्र या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर वादळंच आणलं आणि आता तुफान कमाई करत आहे. हा चित्रपट भारतातच नाही तर परदेशातही चांगली कमाई करत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 7 दिवस झाले असून आकडेवारीनुसार चित्रपटाने 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

दरम्यान, यूपीचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट करून चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला होता. त्याचबरोबर त्यानी भाजपवरही निशाणा साधला आहे. विहिंप नेत्या साध्वी प्राची यांनी टोमणा मारला आहे.

समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'पठाण' सुपरहिट होणे हा देशातील आणि जगातील सकारात्मक विचारांचा विजय आहे आणि भाजपच्या नकारात्मक राजकारणाला जनतेने दिलेले चोख प्रत्युत्तर आहे.

अखिलेश यादव यांच हे ट्विट सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडिया यूजर्स आता त्याच्या ट्विटलाही प्रतिक्रिया देत आहेत.

पठाणची क्रेझ फक्त भारतातच नाही तर परदेशातही पाहायला मिळत आहे. पठाण हा 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. फिल्म ट्रेड एनालिस्ट रमेश बाला यांच्या मते, पठाणने एका आठवड्यात जगभरातील बॉक्स ऑफिसवर 640 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT