Besharam Rang Esakal
मनोरंजन

Pathaan Besharam Rang: वाद झाला पण वाया नही गेला..रेकॉर्डच केला...

सकाळ डिजिटल टीम

गेल्या अनेक दिवसांपासून शाहरूख आणि दीपिकाच्या पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्याने इतका धुमाकूळ घातला होता. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणं रिलीज झालं तेव्हा त्या गाण्यावरून खुप वाद निर्माण झाला होता. या गाण्यांमध्ये दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकनीमुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या असा आरोप करत होता.

अनेक राजकीय नेत्यांनी या चित्रपटावर आणि गाण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिले अनेक ठिकाणी पठाण चित्रपटाचे पोस्टरही जाळले गेले इतकच नाही तर शाहरुखलाही जिंवत जाळण्याची धमकीही देण्यात आली. इतक असूनही शाहरुखच्या 'बेशरम रंग' या गाण्यानं कमाल केली आहे.

शाहरुखच्या 'बेशरम रंग' या गाण्याने 10 दिवसांत 100 मिलियन व्ह्यूज पूर्ण केले आहे. इतकेच नव्हेतर तर या अनेक गाण्याने रेकॉर्ड मोडले आहे. झालं असं की एकीकडे गाण्याबाबत वाद सुरू आहे. तर दुसरीकडे, 'बेशरम रंग'ने चक्क 100 मिलियन व्ह्यूज पूर्ण केले आहेत. या गानं गेल्या काही दिवसांपासून ट्रेण्डं करत आहे.

सर्व साधारण माणूस असो किंवा सेलिब्रिटी प्रत्येकजण 'बेशरम रंग'वर इंस्टाग्राम रील बनवताना दिसत आहे. बेशरम रंग हे गाणं लोकांच्या पसंतीस उतरल आहे. इतकेच नव्हेतर तर आता न्यू इयरच्या पार्टीत हेच गाणं वाजणार असंही चाहते म्हणत आहेत.

हेही वाचा: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

या गाण्याने सलमान खानच्या चित्रपटातील 'राधे' गाण्याचा रेकॉर्ड मोडला आहे . 'राधे'मधील 'व्हिसल मार' या गाण्याला 11 दिवसांत 100 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. 'बेशरम रंग'ने 10 दिवसांत हा विक्रम केला आहे. आता निर्मात्यांनी चित्रपटातील 'झूमे जो पठाण' हे नवीन गाणं रिलीज केलं आहे. या गाण्यात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणची जबरदस्त केमेस्ट्री दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

IND vs SL: शुभमन गिल-रिषभ पंत श्रीलंकेत धुमाकूळ घालणार? WTC मध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : तुम्ही मला अस्पृश्यासारखी वागणूक देता, 'शुद्धीकरण' करता आणि माझा अपमान करता."- खर्गे राज्यसभेत संतापले

‘Gift a Life After Life’! अवयवदानासाठी ५०० विद्यार्थ्यांचा पुढाकार; ‘Tree Of Life’मधून दिला जीवनाचा संदेश

SCROLL FOR NEXT