Ratna Pathak Shah news
Ratna Pathak Shah news Esakal
मनोरंजन

Pathaan: किती मुर्ख! लोकांच्या पोटाला अन्न नाही अन् तुम्ही...भगव्या बिकिनी वादावर रत्ना पाठक संतापल्या

सकाळ डिजिटल टीम

'पठाण' या चित्रपटाचा वाद सध्या चांगलाच तापला आहे. शाहरुख आणि दीपिकाच्या गाण्यामूळं तर याबद्दल जोरदार विरोध देखील येत आहे. मात्र आता या विरोधात बॉलिवूड पुन्हा एकदा दोन गटात विभागलं गेलं आहे. काही लोक हिंदू संघटना आणि उलेमांचे समर्थन करून या गाण्याला अश्लील म्हणत आहेत

तर काही सेलिब्रिटी चित्रपटाच्या बाजूने बोलतांना दिसतं आहेत. त्यातच रत्ना पाठक शहा यांनीही 'पठाण'ला समर्थन दिलं आहे. इतकचं नाही तर त्याला विरोध करणाऱ्यांवर चांगल्याच भडकल्याही आहेत.

नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी 'पठाण'ला विरोध करणाऱ्यांना फटकारले. 'बेशरम रंग' या गाण्यावर भाजप मंत्र्यांनी टीका केली होती तसेच या गाण्यात तिने भगव्या रंगाची बिकिनी घातली आणि त्यामूळे तिने भगव्या रंगाचा अनादर केला होता, जो हिंदू समुदायात पवित्र मानला जातो. तेव्हापासून या गाण्यावरून वाद सुरू झाला आहे.

आपल्या पहिल्या गुजराती चित्रपट 'कच्छ एक्सप्रेस'च्या प्रमोशनसाठी एका मीडिया हाऊसला मुलाखत देण्यासाठी आलेल्या रत्ना पाठक शाह यांनी देशातील सद्यस्थितीबद्दलही आपलं मत माडलं

मात्र, स्वरा भास्करसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी 'पठाण'च्या समर्थनार्थ पुढे आले आहेत, ज्यामध्ये रत्ना पाठक शाह देखील सामील झाल्या आहे. एका मीडिया संस्थेला दिलेल्या मुलाखतीत रत्ना पाठक शाह यांनी ट्रोल्सला फटकारलं आणि सांगितलं की, ती त्या दिवसाची वाट पाहत आहे जेव्हा द्वेष करुन करुन लोक थकतील त्यांना याचा कंटाळा येईल.

अभिनेत्री म्हणाली, "लोकांच्या ताटात जेवण नसतं, पण दुसऱ्याने काय कपडे घातले आहेत यावर त्यांना राग येऊ शकतो." यासोबतच रत्ना पाठक यांना विचारण्यात आले की, जेव्हा एखाद्या कलाकाराला कळतं की त्यांचा ड्रेस हा संपूर्ण देशाचा मुद्दा बनला आहे, तेव्हा त्यांना कसं वाटते? त्यावर रत्ना म्हणाल्या , 'जर तूम्ही डोक्यात या गोष्टींना उच्च स्थान असेल तर मी म्हणेन की आपण अत्यंत मूर्ख काळात जगत आहोत. हा असा मुद्दा नाही ज्यावर मला जास्त बोलण्याची इच्छा आहे किंवा मी त्याला जास्त महत्त्व देऊ इच्छित नाही.

रत्ना पाठक म्हणाल्या- 'पण मला आशा आहे की सध्या जे दिसताय त्यापेक्षा जास्त समजूतदार लोक भारतात आहेत. ते पुढील काळात समोर येतीलचं, कारण जे घडत आहे, ही भीती, बहिष्काराची भावना ही फार काळ टिकणार नाही. मला असं वाटतं की माणूस एका सीमेपलीकडे जास्त द्वेष सहन करू शकत नाही. पण थोड्या वेळाने या द्वेषाचा कंटाळा येतो. मी तो दिवस येण्याची वाट पाहत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींनी गोड बोलून ठाकरेसेनेसाठी खिडकी उघडली? उद्धव ठाकरेंनी भाजपला पाठिंबा देण्याबद्दल दिलं उत्तर

Mumbai Local Train : सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; पुण्यातील बूथवर काँग्रेसचे झेंडे, भाजपचं आंदोलन

Prajwal Revanna Scandal: 'माझ्या आईवर बलात्कार केला अन् व्हिडिओ कॉलवर मला...'; प्रज्वल रेवन्ना स्कँडलमधील पीडितेने सांगितली आपबीती

RCB Qualification Scenario : RCB प्ले ऑफमध्ये जाणार? 18 तारखेला, 18 रन्स, 18 ओव्हर्स अन् चेन्नईचा खल्लास खेळ; समजून घ्या गणित

SCROLL FOR NEXT