Shah Rukh Khan  Sakal
मनोरंजन

Pathaan Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या 'पठाण'ची जादू कायम; 11व्या दिवशी केली एवढ्या कोटींची दमदार कमाई

रिलीजच्या 11व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शनिवारी 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मेगा सुपरस्टार शाहरुख खानचे 4 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 'पठाण' चित्रपटातून पुनरागमन जोरदार झाले आहे. थिएटर्सपासून बॉक्स ऑफिसपर्यंत 'पठाण'ची दमदार कामगिरी सुरू आहे. दररोज 'पठाण'च्या कलेक्शनमध्ये वाढ होत आहे.

अशा परिस्थितीत रिलीजच्या 11व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शनिवारी 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. शाहरुख खानच्या चित्रपटाने शनिवारी किती कोटींची कमाई केली ते जाणून घेऊया.

शाहरुख खानचा 'पठाण' हा आजकाल लोकांची पहिली पसंती आहे. 'पठाण' चित्रपटाचे सर्वजण कौतुक करत आहेत, त्यामुळेच 'पठाण' बॉक्स ऑफिसवरही धमाकेदार व्यवसाय करत पुढे जात आहे.

रिलीजच्या पहिल्याच दिवशी 55 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई करणारा 'पठाण' रिलीज होऊन 11 दिवस उलटूनही थांबायचे नाव घेत नाहीये. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'पठाण'ने शनिवारी बॉक्स ऑफिसवर 21 ते 22 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे 'पठाण'चे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 400 कोटींच्या जवळ पोहोचले आहे.

शुक्रवारच्या 13 कोटींच्या कलेक्शनच्या तुलनेत शनिवारी 'पठाण'च्या कलेक्शनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यासोबतच या दुसऱ्या एक्स्टेंडेड वीकेंडला 'पठाण' 400 कोटींहून अधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन सहज करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

रिलीजच्या 11 दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर येताच आता 'पठाण'चे एकूण कलेक्शन 386 कोटी झाले आहे. एवढेच नाही तर शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. यशराज फिल्म्सच्या मते, 'पठाण'ने रिलीजच्या 10 दिवसांत जगभरात 729 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT