Pathaan Boycott in india, shahrukh Khan movie advance booking in foreign country Google
मनोरंजन

Pathaan Advance Booking: भारतात 'पठाण'ची हवा टाईट, परदेशात मोठी फाईट..

शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' हे गाणं जेव्हापासून रिलीज झालंय तेव्हापासून संबंध भारतात वाद सुरु झालेयत,अगदी बॉयकॉटचीही मागणी झाली आहे.

प्रणाली मोरे

Pathaan Advance Booking: शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटा संदर्भात सध्या देशभरात खळबळ उडाली आहे. 'बेशरम रंग' गाण्यांमध्ये दीपिका पदुकोणने घातलेली केसरी रंगाची बिकिनी यावरनं प्रचंड वाद झाला. चित्रपट बॉयकॉटची करण्याची मागणी केली गेली.. इतकेच नव्हेतर शाहरूखला जीवे मारण्याची धमकी देखील दिली गेली. पण जर्मनीमध्ये मात्र पठाण चित्रपटांची अॅडव्हान्स बुकिंग जोरदार सुरू असल्याचं दिसून आलं आहे. .(Pathaan Boycott in india, shahrukh Khan movie advance booking in foreign country)

जानेवारीमध्ये शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट येणार आहे . किंग खान 4 वर्षांनंतर कमबॅक करत आहे. त्यामुळे शाहरूखच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 28 डिसेंबरपासून जर्मनीमध्ये 'पठाण' अॅडव्हान्स बुकिंग ची आगाऊ बुकिंग सुरू झाली. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून एक महिना बाकी आहेत. पण शोची तिकिट विक्री आधीच सुरू झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगनं तिथे रेकॉर्ड केल्याचं बोललं जात आहे.

भारतात 'पठाण' चित्रपटाला घेऊन अनेक राजकीय पक्षांनी आणि हिंदू संघटनांनी हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही असा रट्टा लावला आहे आणि एकीकडे बाहेरच्या देशात आधीच बुकिंग चालू आहे हे पाहून निर्मात्यांसोबतच व्यापारी तज्ज्ञही खूश आहेत. यावरून असे दिसून येते की पठाण चित्रपटांबद्दल बाहेरच्या देशात आधीच उत्सुकता आहे.

जर्मन मल्टिप्लेक्स साखळीच्या वेबसाइटवर नजर टाकल्यानंतर असे दिसून आले की चित्रपटाची तिकीट विक्री सुरू झाली आहे. बर्लिन, एसेन, डॅमटोर, हार्बर, हॅनोव्हर, म्युनिक आणि ऑफेन बँक येथील 7 सिनेमागृहांमध्ये बुधवार, 25 जानेवारीला पठाणचे शो फुल झाले आहेत. देशात असो किंवा परदेशात, किंग खानचे चाहते त्याला पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झालेयत.

'भारतात अॅडव्हान्स बुकिंग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्स निर्मित 'पठाण' 25 जानेवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात शाहरूख खान सोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT