Pathaan Movie Reaction  esakal
मनोरंजन

Pathaan Movie Reaction : बॉलिवूडकरांना पठाणचं भारी कौतूक! कोण काय म्हणालं पाहाच...

बॉलीवूडचा किंग खान शाहरूख आणि दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.

सकाळ डिजिटल टीम

Pathaan Movie Reaction : बॉलीवूडचा किंग खान शाहरूख आणि दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. ‘पठाण’ हा सिनेमा २५ जानेवारीला चित्रपटातगृहांत धडकला आणि रिलीज होताच या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे.

पठाण प्रदर्शित होऊन फक्त चारच दिवस झाले आहेत. त्यात समोर आलेल्या आकडेवारीनं अनेकांची झोप उडवली आहे. टॉलीवूडच्या केजीएफ, आरआऱआर चे विक्रम पठाणनं मोडल्याची चर्चा आहे. चारच दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने २०० कोटींचा आकडा पार केला आहे. विदेशात हा आकडा ४०० कोटींवर गेला आहे.

पठाण चित्रपटांबद्दल गेल्या दोन महिन्यांपासून प्रचंड चर्चा सुरू होती . या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टर ते टेलर रिलीज पासुन प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्साह होता आणि असणार बॉलिवूडचा बादशहा चार वर्षांनंतर पठाण चित्रपटातून कमबॅक केलं आहे. भारतात आणि भारताबाहेर देखील पठाण चित्रपटाची जादू कायम आहे.

या चित्रपटाचे अँडव्हान्स बुकिंग जोरदार झाले चित्रपटाच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी सकाळपासून थेटर बाहेर जत्रा केलीच होती प्रेक्षकांनी ' पठाण ' चित्रपटाला भरभरून प्रेम केले आणि कौतुक केले आता बॉलिवूडमधील कलाकार का मागे राहणार त्यांनी पठाण चित्रपटाचा फिडबॅक दिला आहे.

भूमी पेडणेकर, श्रेया सिरन, वाणी कपूरने पठाण चित्रपट पाहिला आणि या चित्रपटाने भरभरून कौतुक केले खुप दिवसांनी बॉलिवूडमध्ये असा चित्रपट बनला आहे शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांनी उत्तम अभिनय केला आहे. तर अनिल कपूर आणि बोनी या कपूर भावांनी ' पठाण ' चित्रपटाला बॉम्ब म्हणून उपमा देवा बॉलिवूडमध्ये बॉम्ब फुटला आहे. तर नर्गिस फक्रीला पठाण चित्रपटातील गाणी जबरदस्त आवडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा मोठा बदल होणार? कच्च्या तेलाच्या किमतीतील हालचालींनंतर समोर आली महत्त्वाची अपडेट

Gokul Election: सतेज पाटील यांच्याकडे ठराव ; कमी म्हणून भाजप नेत्यांच्या घरी; खासदार धनंजय महाडिक यांचा टोला

Gokul Election Power Struggle: ‘गोकुळ’मध्ये आता सत्तासंघर्ष अटळ; हरकतीचा निर्णयही आव्हानाच्या तयारीत; न्यायालयीन आणि राजकीय लढाई सुरूच राहणार

Marathi News Live Updates : कोयना धरणातून १,०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

ACB Trap: २५ लाखांचा लाचेचा सौदा, ५.५० लाख घेताना दोन दलाल रंगेहाथ; अकलूजमध्ये एसीबीची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT