Pathaan Movie Release Esakal
मनोरंजन

Pathaan Movie Release: इंदूरमध्ये पठाणचे अनेक शो रद्द, थिएटरला आग लावण्याची धमकी तर प्रेक्षकांना पळवले..

Vaishali Patil

शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट आज थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.अनेक ठिकाणी 'पठाण' ची क्रेझ पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी या चित्रपटाला विरोधही करण्यात येत आहे.

इंदूरमधील सपना संगीता टॉकीजसमोर एका हिंदू संघटनेकडून या चित्रपटाला जोरदार विरोध करण्यात आला. निदर्शने करण्यात आली. यानंतर सकाळी ९ वाजेचा शोही रद्द करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही पहिल्या दिवसाचा पहिला शो रद्द करण्यात आला असल्याचा दावा करण्यात येत आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर घोषणाबाजी करत मल्टिप्लेक्स पेटवून देण्याची धमकी दिली.  घटनास्थळी मोठ्या संख्येने सुरक्षा दलही हजर आहे.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याला आणि दीपिकाच्या भगव्या बिकिनीला कडाडून विरोध केला. आता चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दिवशी मध्य प्रदेशात ठिकठिकाणी पठाणला विरोध केला जात आहे.

इंदूरमध्ये बजरंग दलाच्या आंदोलकांनी शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाचा पोस्टर बॅनर फाडून निषेध केला. त्याचवेळी ग्वालियरमध्ये बजरंग दलाने सिनेमा हॉल पेटवण्याची धमकी दिली आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे हिंदू महासभेच्या दक्षिणपंथी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी चित्रपटाच्या पोस्टरवर शाई फेकून ते फाडले. हिंदु महासभेचे नेते संजय जाट म्हणाले की, संघटना कोणत्याही किंमतीत ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, तर बजरंग दलाचे राज्य सहसंयोजक दिग्दिविजय नाथ तिवारी यांनी सांगितले की, माझा आणि त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांचाही या चित्रपटाला विरोध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT