Pathaan Google
मनोरंजन

Pathaan: जगभरात 'पठाण' चा उदो उदो...पण बांग्लादेशात मात्र प्रदर्शनास होतोय विरोध..जाणून घ्या कारण

काही दिवसांपूर्वीच बांग्लादेशात हिंदी सिनेमांना रिलीजची परवानगी मिळाली असताना हा विरोध हैराण करणारा आहे.

प्रणाली मोरे

Pathaan: शाहरुख खान,दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहमच्या 'पठाण' सिनेमानं जिथे एकीकडे भारतात ५०० करोडचा बिझनेस केला तिथे जगभरात हजार करोडचं कलेक्शन केलं आहे.

यादरम्यान घोषणा झाली होती की 'पठाण' बांग्लादेशमध्ये २४ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे,पण तेवढ्यात बांग्लादेशी अभिनेता डिपजॉलनं यावर आक्षेप घेतल्याचं समोर आलं. त्यानं हिंदी सिनेमा आणि त्याच्या गाण्यांना 'अश्लील' म्हटलं आहे.(pathaan release issue in bangladesh bangladeshi actor claimed that hindi films have obscene scene and song)

शाहरुख खानचे बांग्लादेशी चाहते खूपच उत्साहित होते की 'पठाण' २४ फेब्रुवारी रोजी त्यांच्या देशात रिलीज केला जाणार आहे,पण तिथली फिल्म इंडस्ट्री मात्र या गोष्टीनं एकदम नाराज दिसत आहे.

काही दिवांपूर्वी बांग्लादेशच्या सूचना मंत्रालयानं देशात हिंदी सिनेमांना रिलीज करण्यासाठी परवानगी दिली होती. सिनेमाशी संबंधित १९ संघटनांसोबतच मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या गोष्टीवर सहमती दर्शवत दरवर्षी १० हिंदी सिनेमे बांग्लादेशातील सिनेमागृहात रिलीज केले जातील असं सांगितलं होतं.

बांग्लादेशी सिनेमांत प्रामुख्यानं खलनायकी भूमिका साकारणारा अभिनेता डिपजॉल मात्र या निर्णयावर नाराज झाला आहे.

लोकल मीडियाशी बातचीत करताना या बांग्लादेशी अभिनेत्यानं सांगितलं की ,''बांग्लादेशी सिनेमा चांगल्या दर्जाचे सिनेमे बनवून प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे काम करत आहे. यामध्ये जर हिंदी सिनेमे रिलीज झाले तर याचा आमच्या सिनेमांवर मोठा परिणाम होईल''. डिपजॉल याचे स्वतःचे ५ सिनेमे रिलीजच्या जवळ आहेत.

अभिनेता पुढे म्हणाला की,''काही दिवासंपूर्वी बांग्लादेशी सिनेमांनी चांगलं परफॉर्म केलं होतं आणि प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत खेचून आणण्यात यशस्वीही ठरला होता, पण हिंदी सिनेमा आणि बांग्लादेशी सिनेमांचे एथिक्स जुळत नाहीत. हिंदी सिनेमात अश्लील गाणी आणि सीन्सचा भरणा असतो,जी आमची संस्कृती नाही''.

डिपजॉलचं म्हणणं आहे की आम्ही बांग्लादेशात क्लीन आणि कुटुंब एकत्र बसून एन्जॉय करेल असे सिनेमे बनवतो. आमच्या सिनेमातून लोकांना चांगलं शिक्षण मिळेल आणि त्यांचे मनोरंजन होईल याकडे आम्हीअधिक लक्ष देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT