Pathaan Movie promotion  esakal
मनोरंजन

Pathaan Movie : शाहरुखवर काय दिवस आले! 'पठाण' च्या प्रमोशनसाठी दुबईतल्या रस्त्यांवर नाचतोय 'किंग'!

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा पठाण हा पुढील आठवड्यात प्रदर्शित होतो आहे. २५ जानेवारीला तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pathaan Shah Rukh Khan Bollywood Actor Dubai Pramotion : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा पठाण हा पुढील आठवड्यात प्रदर्शित होतो आहे. २५ जानेवारीला तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून शाहरुखचा पठाण हा चर्चेत आला आहे. त्यावर सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी पठाण चित्रपटावरुन वाद सुरु झाला होता. त्यामध्ये दीपिकानं परिधान केलेली भगव्या रंगाची बिकीनी ही नेटकऱ्यांना खटकली होती. त्यावरुन धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या. काही झालं तरी हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका काही हिंदू संघटना तर अनेक राजकीय पक्षांनी घेतली होती. शाहरुखला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

Also Read - शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

शाहरुखनं सोशल मीडियावर चाहत्यांना आवाहन केले होते की, आजकाल वेगळ्या प्रकारची नॅरेटिव्ह तयार करुन त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम केले जात आहे. माझ्या चित्रपटावर जी टीका होत आहे त्यात काय खरं आणि काय खोटं हे लोकांनी चित्रपट पाहून ठरवावं. त्यामुळे सोशल मीडियानं लोकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. तेच सगळं ठरवतात की काय असा प्रश्न किंग खाननं उपस्थित केला होता.

यासगळ्यात शाहरुख त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन सोडून भारतात नव्हे तर दुबईमध्ये करत असल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो दुबईमध्ये प्रमोशन करत असल्याचे दिसत आहे. यावेळी त्याच्या चित्रपटातील झुमे जो पठाण गाण्यावर नागरिक नाचत असल्याचे त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सोशल मीडियावर किंग खानच्या त्या व्हिडिओवर प्रचंड लाईक्स आणि व्ह्युज आले आहेत. दुसरीकडे त्याला ट्रोल देखील करण्यात आले आहे. एकानं तर शाहरुखवर काय वेळ आली आहे, त्याला त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन भारतात नव्हे तर दुबईत करावे लागत आहे. दुसऱ्यानं तर शाहरुखसाठी हा प्रवास काही सोपा असणार नाही. असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT