Shah Rukh Khan Fifa World Cup 2022
Shah Rukh Khan Fifa World Cup 2022 esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan Fifa World Cup 2022: 'भांडी घासली, कपडे धुतली' किंग खान फिफामध्ये बोलला!

सकाळ डिजिटल टीम

Pathaan Shah Rukh Khan bollywood actor fifa world cup final 2022 : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते आहे. त्याचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार असल्यास त्यापूर्वी तो खूप व्हायरल होताना दिसतो. आताही तसेच झाले आहे. त्याचा पठाण नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पठाण वादाच्या भोवऱ्यातही सापडला आहे.

किंग खान अशी ओळख असलेला शाहरुख हा तीन वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला पठाणच्या माध्यमातून येणार आहे. त्याच्या पठाणचा टीझर, आणि दीपिकासोबतचं गाणं व्हायरल झालं होतं. ते गाणं वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे. त्या गाण्यावरुन त्याला सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांनी जे नाही ते ऐकवले आहे. यासगळ्यात त्याची सहअभिनेत्री दीपिकाला तिच्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. अशातच किंग खान हा फिफाच्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सहभागी झाला होता.

शाहरुखनं फिफाच्या वर्ल्डकपच्या फायनल दरम्यान जे वक्तव्य केलं आहे ते सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. त्यानं आपण पठाणसाठी जे सिक्स अॅब्जची तयारी केली त्यासाठी काय केलं याविषयी सांगितलं आहे. आपल्याला घरातील कामं करावी लागली. वेळ पडल्यास आपण भांडी घासली, कपडे धुतली आणि स्वताला पठाणच्या वेगळ्या रोलसाठी तयार केले असे किंग खाननं सांगितलं आहे.

पठाणला जगभर प्रमोट करण्यासाठी शाहरुख हा फिफाच्या फायनलमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्यानं आपल्याला घरकाम करावं लागलं हे सांगितल्यानं त्याला सोशल मीडियावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियांना सामोरं जावं लागत आहे. पठाणसाठी आपल्याला चार वर्षे तयार करावी लागली. हा प्रवास आपल्यासाठी किती संघर्षमय होता हे शाहरुखनं सांगितलं आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चाहत्यांच्या कुतूहलाचा विषय झाला आहे.

बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी मला खूप प्रयत्न करावे लागले. मी खूप वर्क आऊट केले होते. कोरोनाच्या काळात आपण सगळे घरात बंद होतो तेव्हा मी घरातील सर्व कामं केली. भांडी घासली, कपडेही धुतली घरातील सगळी कामं केली. त्याचा मला आता फायदा होतो आहे असेही किंग खाननं सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळीनं झोडपलं

SCROLL FOR NEXT