Pakistan Actress On Pathaan  esakal
मनोरंजन

Pakistani Actress On Pathaan : 'आमच्या पाकिस्तानात तर शाहरुख खानला...' अभिनेत्री बोलून फसली!

बॉलीवूडच्या किंग खानच्या पठाणची भुरळ आता पाकिस्तानातील कलाकारांना पडली आहे. सोशल मीडियावर एका पाकिस्तानी अभिनेत्रीच्या प्रतिक्रियेनं किंग खानच्या फॅन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pathaan Shah rukh khan movie pakistani actress Anoushey Ashraf : बॉलीवूडच्या किंग खानच्या पठाणची भुरळ आता पाकिस्तानातील कलाकारांना पडली आहे. सोशल मीडियावर एका पाकिस्तानी अभिनेत्रीच्या प्रतिक्रियेनं किंग खानच्या फॅन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. तर नेटकऱ्यांना तिनं प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. सध्या ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

सोशल मीडियावर अनोशे अशरफनं लिहिलं आहे की, जितक्या लोकांना शाहरुख आवडत नाही आणि आमच्या पाकिस्तानातील लोकांना असे वाटतं की, बॉलीवूडच्या कलाकारांना आपण प्रमोट करण्याची गरज नाही त्यांच्यासाठी शाहरुख खान मोठं उत्तर आहे. त्याचे जेवढे कौतूक करावे तेवढे कमीच आहे. शाहरुख सारख्या कलाकारांनी नेहमीच दोन देशांमधील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यांनी जी नकारात्मकता आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Also Read - T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

पाकिस्तानी अभिनेत्रीच्या त्या पोस्टनं मात्र नेटकऱ्यांना चांगलाच राग आला आहे. त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. शाहरुख खाननं खूप काही केले आहे. मला नेहमीच त्याचे कौतूक वाटत आले असून मी त्यांची फॅन राहणे पसंत करेल असेही त्या अभिनेत्रीनं म्हटल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवरुन तिला चांगलेच सुनावले आहे.

Pakistan Actress On Pathaan

पाकिस्तानी अभिनेत्रीनं दिलेल्या प्रतिक्रियेनंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले आहे. नेटकऱ्यांनी तिच्यावर चांगलीच टीका केली आहे. तुला शाहरुखचा एवढा पुळका का, तुमच्या देशात कलाकारांना चांगली कामं मिळत नाही असं म्हटल्यावर भारतातल्या कलाकाराचं कौतूक केल्यावर भारतात येऊन प्रसिद्धी मिळवायची. हे गोष्ट काही नवीन नाही. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी अनोशे अशरफनं झाडले आहे.

त्यावर तिनं देखील आपल्याला ट्रोल करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. ती म्हणते, मित्रांनो मी माझ्या सोशल मीडियावर मला जे वाटते ते लिहिते, त्यावरुन मला कुणाच्या भावना दुखवायच्या नसतात. तेव्हा नेटकऱ्यांनी मला चुकीच्या पद्धतीनं विचारात घेऊ नये. लोकांना मी काय म्हणते याचाही राग आहे. हे पाहून आता आपण आपले मत मांडायचेच नाही का असा प्रश्नही तिनं यावेळी विचारला आहे.

शाहरुख सारख्या कलाकारांना केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळे त्या कलाकारांविषयी प्रतिक्रिया देणं यात काही वाईट आहे असे आपल्याला वाटत नाही. नेटकऱ्यांनी आपण काहीही बोललं तरी खुपतं हे आता कळून चुकलं आहे. असे पाकच्या अभिनेत्रीनं म्हटले आहे.

पठाणविषयी बोलायचे झाल्यास आता पठाणनं जगभरातून पाचशे कोटींची विक्रमी कमाई केली आहे. पहिल्या दिवसापासूनच पठाणनं दणक्यात सुरुवात केल्याचे दिसून आले आहे. किंग खानचा चार वर्षानंतर आलेल्या या चित्रपटानं एकामागून एक वेगवेगळे विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे किंग खानच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भारतातून तीनशे कोटींपेक्षा जास्त कमाई या चित्रपटानं केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025: मोठी बातमी! बिहार विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला?

Pune Ward Structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल?

Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Latest Marathi News Live Update: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेस आक्रमक, तहसीलदारांसोबत बाचाबाची

SCROLL FOR NEXT