Pathaan Row esakal news
मनोरंजन

Pathaan Row: '...तर शाहरुखला जिवंत जाळणार'! अयोध्येच्या संत परमहंस दासांची धमकी

आता तर अयोध्येतील संत परमहंस यांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shah Rukh Khan Death Threat For Pathan Film: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि त्याचा पठाण हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील बेशरम रंग नावाचे गाणे प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावरुन शाहरुख आणि दीपिकाचा जोरदार निषेध केला जात आहे. आता तर अयोध्येतील संत परमहंस यांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे.

बेशरम रंग वरुन दीपिका आणि शाहरुखनं हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचे दिसून आले आहे. दीपिकानं परिधान केलेली भगव्या रंगाची बिकीनी ही वादग्रस्त असून त्यामुळे वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. यापूर्वी मध्यप्रदेश, राजस्थान राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाद सुरु झाला आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी तर पठाण हा चित्रपट आपल्या राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. शाहरुखनं यासगळ्या गोष्टींवर प्रतिक्रियाही दिली आहे.

Also Read- असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Shah Rukh Khan Death Threat For Pathan Film:

शाहरुखनं तर यासगळ्याला सोशल मीडिया जबाबदार असल्याचे म्हटले होते. एका कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या किंग खाननं तर सोशल मीडियावर जे काही बोललं जातं त्यातून आपलं ठाम मत तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम संबंधित गोष्टींवर होत असल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर जेवढी नकारात्मकता पसरते त्याची सर्वाधिक चर्चा होते. असे किंग खाननं सांगितले होते.

यासगळ्यात अयोध्येतील संत परमहंस दास यांनी तर शाहरुखच्या पठाणवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी शाहरुखला जिहादी म्हटलं असून त्याला जिवंत जाळण्याची धमकी दिली आहे. पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही त्यांनी केले. शाहरुखच्या पठाणच्या विरोधात उत्तर प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनं सुरु झाली आहेत. त्याच्या चित्रपटाशी संबंधित वाद काही थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही.

पठाणमधून भगव्या रंगाचा अपमान करण्यात आला आहे. त्यानं हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. आज आम्ही शाहरुखचे पोस्टर जाळले आता तो भेटला तर त्याला जाळल्याशिवाय राहणार नाही. असा आक्रमक पवित्रा परमहंस दासांनी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT