Netizens troll the latest song of pathann's Besharam Rang,memes viral Google
मनोरंजन

Deepika Padukone: 'बेडखाली चप्पल शोधतेयस का?', 'बेशरम रंग' गाण्यातील हूक स्टेपवरनं दीपिका ट्रोल...

'पठाण' सिनेमातील शाहरुख अन् दीपिकावर चित्रित झालेल्या 'बेशरम रंग' गाण्यावरनं अनेक मजेदार मीम्स व्हायरल होत असताना बॉयकॉटची देखील मागणी होताना दिसतेय.

प्रणाली मोरे

Deepika Padukone: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या पठाण चित्रपटातील गाण्यांची चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि 'बेशरम रंग' हे पहिले गाणे रिलीज झाले. या गाण्यात दीपिका पदुकोणचा बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला. दीपिकाचा दमदार डान्स चाहत्यांना घायाळ करत आहे. मात्र हे गाणे सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले. दीपिकाच्या डान्स स्टेप्सवर फनी मीम्स बनवले जात आहेत. (Netizens troll the latest song of pathann's Besharam Rang,memes viral)

या गाण्यामध्ये दीपिका पदुकोणने हुक स्टेप केली आहे. काहीना तिचा डान्सचे कौतुक केले तर काहीनी मीम्स तयार केले. दीपिकाची एक डान्स स्टेप आहे ज्यामध्ये ती वाकते आणि वळते आहे. गाणे रिलीज झाल्यावर लोकांनी या हुक स्टेपवर बनवलेले मजेदार मीम्स व्हायरल होत आहेत.

हेही वाचा- संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

एका यूजरने लिहिले - 'बेडखाली माझी चप्पल शोधत आहे'.

दुसर्‍याने लिहिले - 'कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि माझी आवडती दीपिका पदुकोण काय विचार करत होती?',लोकांनी दीपिकाला तर ट्रोल केले पण बॅकग्राउंड डान्सर्सला पण ट्रोल केले आहे . कुणा एका नेटकऱ्यानं लिहिलंय, 'बॅकग्राउंड डान्सर्स तर अंगात भूत आल्यासारखे नाचत आहेत'.

'मेकर्सना चांगला कोरिओग्राफर का सापडला नाही?', असे युजर्सचे म्हणणे आहे. डान्सिंग स्टेप्स पाहून लोक गोंधळून गेले आहेत.

एका यूजर्सला तर हा प्रश्न पडला आहे की,'गाण्यात दीपिका आणि बॅकग्राउंड डान्सर्स नेमकं काय करत आहेत?'.

इतकेच नाही तर अनेकांनी दीपिकाच्या डान्सिंग अॅक्टवरच नाही तर संपूर्ण गाण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. युजर्सनी 'पठाण'च्या गाण्याची तुलना जैनच्या मकेबा गाण्याशी करत तेच गाणं 'पठाण'मध्ये कॉपी असल्याचे केले आहे. युजर्सने मेकर्सवर 'मकिबा' गाणे चोरल्याचा आरोपही केला आहे. 'बेशरम रंग' आणि 'मकिबा' या दोन्ही गाण्यांच्या क्लिप शेअर करून लोक आता पुरावा देत आरोप करत सुटले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT