Pawan Singh Google
मनोरंजन

Pawan Singh Video: ही कसली वाढदिवसाची पार्टी..पवन सिंहच्या पाहुण्यांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या

५ जानेवारी २०२३ रोजी भोजपूरी अभिनेता पवनसिंगनं आपला वाढदिवस साजरा केला होता. त्या पार्टीत उडालेल्या गोंधळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

प्रणाली मोरे

Pawan Singh: भोजपुरी सिनेसृष्टीतील सुपर स्टार पवन सिंगचा वादांशी जुना संबंध आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. 5 जानेवारी रोजी पवन सिंगने त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला.

ज्यामध्ये त्याच्या अनेक चाहत्यांनी हजेरी लावली. पवन सिंगने वाढदिवसानिमित्त त्याचे नवीन गाणे देखील लाँच केले, परंतु त्याच्या कार्यक्रमादरम्यान भलतेच घडले आणि वाढदिवसाच्या पार्टीचे रूपांतर हाणामारीत झाले.(Pawan Singh Birthday Party ruckus viral video)

झालं असं की,पवन सिंहने वाढदिवसाच्या दिवशी 'पांच के नाचे आयहा' हे भोजपुरी गाणे लाँच केले, ज्यासाठी तो स्टेजवर चढला आणि बोलू लागला तेव्हा तिथे उपस्थित लोकांनी गोंधळ सुरू केला.खुर्च्या फेक करत मोठा राडा सुरु झाला. त्या पार्टीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये काही लोक एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत आणि नंतर भांडण इतके वाढले की लोक एकमेकांवर खुर्च्या फेकायला आहेत.

व्हिडिओमध्ये पवन सिंह हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, लोकांनी त्यांचे ऐकले नाही, त्यानंतर पवन सिंह कार्यक्रमातून निघून गेलेला दिसत आहे. पवनच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया येत आहेत. पण पवन सिंहच्या एखाद्या कार्यक्रमात भांडण होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही एका स्टेज शोदरम्यान मारामारी झाली होती, त्यानंतर पवन सिंह तेथून निघून गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल! नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींना लाखोंना गंडा

Latest Maharashtra News Updates : आमदार हेमंत पाटील यांच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने केला निषेध

Viral Video: लहानपणीची गोष्ट खरी ठरली! ससा अन् कासवाची लावली स्पर्धा; ससा का हरतो? खरं कारण आलं समोर

Nashik News : सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक

Hadsar Fort: हडसर गडावर सापडला इतिहासाचा अमूल्य ठेवा; गड संवर्धन मोहिमेत मिळाला फारसी शिलालेख

SCROLL FOR NEXT