Payal Ghosh Suicide Note post viral Google
मनोरंजन

Payal Ghosh: अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पायल घोषची सुसाइड नोट व्हायरल..गंभीर आरोप करत म्हणालीय..

अभिनेत्री पायल घोषनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर जी सुसाइड नोट पोस्ट केलीय ती अर्धवट लिहिलेली आहे..पण त्यावरनं खूप खळबळ उडाली आहे.

प्रणाली मोरे

Payal Ghosh Suicide Note: मॉडेल पायल घोष पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सिने- निर्माता अनुराग कश्यप विरोधात मी टू चे आरोप करणारी वादग्रस्त अभिनेत्री पायल घोष हिनं सोशल मीडियावर सुसाइड नोटचा एक स्नॅपशॉट शेअर केला आहे.

नोटमध्ये तिनं काही लोकांची नावं समोर आणण्याची धमकी दिली आहे जे तिच्या आत्महत्येसाठी कारणीभूत असतील. पण,तिनं पोस्ट केलेल्या फोटोमध्ये पहाल तर ती सूसाईड नोट पूर्ण लिहिलेली नाही..अर्धवटच सोडलेली आहे.

तिच्या इन्स्टाग्रामवर ही नोट काहीच वेळात जोरदार व्हायरल झाली. आणि तिचे फॉलोअर्स ती पोस्ट पाहून हैराण झाले. कुणालाच काही कळेना नेमकं झालं काय आहे. पण अनेकदा पाहिलं गेलंय की मानसिक स्वास्थासंबंधित अनेक गोष्टी पायल सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.(Payal Ghosh Suicide Note post viral actress tells who will be responsible)

नोटमध्ये लिहिलंय की, ''मी आहे पायल घोष,जर मी आत्महत्येमुळे किंवा हार्ट अटॅक येऊन मेली तर त्याच्यासाठी जे लोक जबाबदार असतील ते आहेत...''

आता या तिच्या नोटमुळे काही फॉलोअर्स चिंतेत पडले तर काहींनी मात्र प्रसिद्धिसाठी सुरु आहे सगळं म्हणत तिला जोरदार ट्रोल केलं. तर काही लोकांनी तिला मानसिक स्वास्थ्य बिघडलं असेल तर डॉक्टरची मदत घे असं देखील सूचित केलं आहे.

याआधी पायलनं डिप्रेशनसोबतचा आपला संघर्ष लोकांसमोर मांडला होता..जेव्हा टी.व्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिनं सेटवर आत्नहत्या केली होती.

आपल्या आयुष्यातील एक अशी फेज जिच्या आठवणीही मला जवळ ठेवायच्या नाहीत..असं म्हणत ती म्हणाली होती,''मानसिक स्वास्थ एक अशी गोष्ट आहे ज्याच्याकडे आपण कायम दुर्लक्ष करतो आणि डिप्रेशन खूप दब्या पावलांनी तुमच्या आयुष्यात येतो आणि तुमच्या अख्ख्या आयुष्याची उलथा-पालथ करून जातो''.

''माझी मानसिक अवस्था खूप गंभीर नव्हती तोपर्यंत सगळं ठीक होतं..पण एका क्षणी जर माझ्या भावानं मला वाचवलं नसतं तर मी माझ्या बिल्डिंगमधून खाली उडी मारली असती''.

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

ती पुढे म्हणाली होती,''हा आजार असा आहे की दुर्लक्ष केलं तर तो अधिक घातक ठरू शकेल. मला वाटतं मानसिक स्वास्थ्य सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे,ती जर नीट नसेल तर आपण आपल्या करियरपासून खूप दूर निघून जातो''.

''मी स्वतःला याबाबतीत खूप भाग्यवान समजते की मी वेळीच यातनं बाहेर आले. आणि मला यातून बाहेर काढण्यात ज्या लोकांनी मदत केली त्यांची मी खूप आभारी आहे''.

दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर २०२० मध्ये पायल घोष चर्चेत आली होती. पण त्यावेळी अनुराग कश्यपनं तिच्या सर्व आरोपांना खोटं ठरवत धुडकावून लावलं होतं.

आता पुन्हा पायलच्या या अर्धवट सुसाइड नोटनं खळबळ उडवून दिली आहे. तिला नेमकं काय म्हणायचंय..ती खरंच आत्महत्येच्या विचारात आहे का..असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आता निर्माण झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

Sunday Special Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ब्रेड पिझ्झा, लगेच नोट करा रेसिपी

दैव की कर्म?

SCROLL FOR NEXT