Payal Rohatgi backs Deepika Padukone after Boycott Pathaan trend for saffron bikini
Payal Rohatgi backs Deepika Padukone after Boycott Pathaan trend for saffron bikini  sakal
मनोरंजन

Pathaan Controversy: हा निव्वळ मूर्खपणा.. भगव्या बिकिनीवर बोलली पायल रोहतगी..

नीलेश अडसूळ

payal rohatgi on Pathaan Controversy: बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान तब्बल ४ वर्षानंतर 'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत असल्याने चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. नुकतेच या चित्रपटाचे 'बेशरम रंग' ही गाणे आऊट झाले आणि रंगाचा बेरंग झाला. या गाण्यात दीपिकानं घातलेल्या बिकिनीवरनं खळबळ सुरू झाली आहे. ही बिकिणी भगव्या रंगाची असल्याने हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. मात्र यामध्ये अभिनेत्री पायल रोहतगीने दीपिकाची बाजू घेत, आपली नाराजी व्यक्त केली आहे.

(Payal Rohatgi backs Deepika Padukone after Boycott Pathaan trend for saffron bikini)

दीपिकाने भगवी बिकिनी घालणं हा हिंदुत्वाचा अपमान आहे अशी भूमिका घेत हिंदुत्ववादी संघटना पेटून उठल्या आहेत. अनेक ठिकाणी शाहरुखचे फोटो जाळण्यात आले. तर चित्रपट प्रदर्शित झाला तर थिएटर पण जाळून टाकू असा आक्रमक पवित्रा हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला आहे. मध्य प्रदेशमधील इंदौर शहरात या गाण्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं आहे. तर राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही चित्रपटाला विरोध केला आहे.

या वादामुळे आता ‘बॉयकॉट पठाण’ म्हणजे 'पठाण' वर बंदी घाला हा ट्रेंडही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. पण अभिनेत्री पायल रोहतगी हिने मात्र दीपिकाची बाजू घेत या प्रकाराला विरोध केला आहे. तिच्या या भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. भगव्या बिकिणीमुळे चित्रपटाला विरोध करणं ही पूर्णतः लाजिरवाणी गोष्ट आहे, शिवाय याला कसलाही आधार नाही असं ती म्हणाली आहे.

एका माध्यमाशी बोलताना ती म्हणाली, “माझ्यामते हे आरोप अत्यंत बिनबुडाचे आहेत. एखाद्या रंगाला उद्देशून वाद निर्माण करणं चुकीचं आहे, दीपिकाच्या बिकिनीवर कोणत्याही सनातन धर्मातील देवी देवतांचे फोटो नाहीयेत. केवळ एका विशिष्ट रंगावरून एखाद्या कलाकृतीला विरोध कसा करता येऊ शकतो?'

पुढे ती म्हणाली, 'मध्यंतरी मी ज्या रीयालिटि शोमध्ये सहभागी झाले होते त्याचा युनिफॉर्मही भागव्या रंगाचाच होता. अशा गोष्टीवरून वाद उत्पन्न करणारी माणसं ही मूर्ख आहेत. अशा पद्धतीने विरोध करून चित्रपटाचं नुकसान नव्हे तर त्याला आणखी फायदा होणार आहे. सीएएच्या वेळी मी स्वतः दीपिकाच्या विरुद्ध मत मांडलं होतं. पण आत्ता मात्र तिला उगाचच टार्गेट केलं जात आहे.' असे मत तिने मांडले.

या गाण्यातील दीपिकाच्या हॉट लूकवर टीका करणाऱ्यांनाही तिने चांगलंच शेकलं आहे. पायल म्हणते, 'जर दीपिका यात तुम्हाला अश्लील वाटत असेल तर मग आपल्याच देशात पॉर्नसारखी गोष्ट तुम्ही कशी सहन करता. इथे आपल्या मनोरंजनसृष्टीत तर एका पॉर्नस्टारला अभिनेत्रीचा दर्जा दिलेला आहे. हा दुटप्पीपणा थांबवला पाहिजे. उगाचच भगव्या रंगाचा आधार घेऊन या वादाला आणखी मोठं होण्यापासून रोखलं पाहिजे. असं असेल तर हिरव्या रंगसुद्धा एका समाजाचं प्रतिनिधित्व करतो, तर मुलींनी हिरवी बिकिनी परिधान करणंसुद्धा सोडून द्यायला हवं का?'

हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदूकोणबरोबर जॉन अब्राहमसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT