Pedro Henrique brazilin singer death  esakal
मनोरंजन

Pedro Henrique Death : स्टेजवर गात असतानाच पडला, 30 वर्षीय गायकानं घेतला अखेरचा श्वास!

गॉस्पल सिंगर म्हणून लोकप्रिय असलेल्या हेन्रिक नावाच्या गायकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

युगंधर ताजणे

Pedro Henrique brazilin singer death : गॉस्पल सिंगर म्हणून लोकप्रिय असलेल्या हेन्रिक नावाच्या गायकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मुळचा ब्राझीलच्या असणारा हेन्रिक हा स्टेजवर गात असतानाच त्याला मृत्यूनं गाठलं. त्यानं वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

ब्राझीलच्या एका धार्मिक कार्यक्रमामध्ये हेन्रिक सहभागी झाला होता. त्या कार्यक्रमामध्ये तो गाणं सादर करत होता. एकाचवेळी तो गायन आणि श्रोत्यांशी संवाद साधत होता. तेव्हा तो अचानक जमिनीवर कोसळला अन् बेशुद्ध पडला. दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेन्रिकचा तो परफॉर्मन्स चाहते एंजॉय करत होते. मात्र त्याचवेळी घडलेल्या त्या प्रसंगानं त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निधनानंतर ब्राझील संगीतविश्वामध्ये शोक व्यक्त केला जात आहे. अनेक सेलिब्रेटींनी त्याला आदरांजली वाहिली आहे. त्या व्हिडिओमध्ये दिसून येते की, हेन्रिक स्टेजवर प्रेक्षकांशी संवाद साधत, गायन करतो आहे. त्यावेळी चाहते देखील त्याच्या गाण्यांना दाद देत आहे.

याप्रसंगी एका कडव्यानंतर हेन्रिक विश्रांती घेतो. त्याचा तोल ढासळून तो खाली पडतो अन् बेशुद्ध होतो. त्याचवेळी तातडीनं सहवादक त्याच्या दिशेने धावत येत त्याला उचलतात आधार देण्याचा प्रयत्न करतात. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखलही करण्यात आले. उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

याबाबत हेन्रिकचे रेक़ॉर्ड लेबल तोडह म्युझिकनं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, त्याला जोराचा हदयविकारानं मृत्यू झाला. हेन्रिकच्या बाबत सांगायचे झाल्यास तो एक मनमिळावू व्यक्तिमत्वाचा कलाकार होता. त्याची सगळ्यांशी मैत्री होती. त्याच्या जाण्यानं आम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे. अशा प्रतिक्रिया संगीतविश्वातून समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Niger Airport Attack : आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला; ११ सैनिकांसह ३५ जण ठार; सुरक्षा दलाकडून २२ दहशतवाद्यांना कंठस्नान

Yeola Bribery Case : 60 हजार घेऊनही पोट भरले नाही! येवल्यात मुख्य लिपिक सुधीर वाघ लाचलुचपतच्या जाळ्यात, 5 हजार घेताना अटक, सावकारी परवान्यासाठी मागितली लाच

Viral Video: 'माझ्या गालावर पप्पी दे...' ; परदेशी पर्यटकाला रस्त्यात अडवलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद

'वेलकम टू द जंगल'सिनेमातील 'हे' गाणं ऐकलं का? अमृता फडणवीस यांच्या आवाजाची चर्चा; नेटकरी म्हणाले...

Solapur Water Crisis: उजनी धरणात उणे २४.३७% पाणीसाठा, साेलापूर जिल्ह्यातील ४४ तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT