sonam 
मनोरंजन

तू अभिनय करणंच सोडून दे...सोनम कपूरवर नेटकरी संतापले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई  : लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांशी कशा प्रकारे संवाद साधता येईल यासाठी नवनव्या युक्त्या कलाकार मंडळी लढवीत आहेत. कोणी युट्यूब चॅनेल काढलं आहे तर कोणी घरबसल्या नवनवीन व्हिडिओ, लघुपट तयार करत आहेत. आपण घरबसल्या काय करत आहोत हे देखील कलाकार त्यांच्या चाहत्यांपर्यंत सोशल मीडियाद्वारे पोहचवत आहेत. मात्र हे सारं करत असताना बऱ्याच कलाकार मंडळींना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. आता असंच काहीसं अभिनेत्री सोनम कपूरच्या बाबतीत घडलं आहे.

सोनम सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. लॉकडाऊनमध्येही नवनवीन फोटो, व्हिडिओ शेअर करत ती आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. पण आता एक पोस्ट शेअर करणं सोनमला चांगलंच महागात पडलं आहे. सोनमने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे.

यामध्ये तिने एक स्टायलिस्ट गाऊन परिधान केला आहे आणि चेहऱ्यावर अगदी निरागस हावभाव दिसत आहेत. सोनमचा ग्लॅमरस अंदाजातील हा फोटो दिसायला क्युट असला तरी तिने या फोटोला दिलेली कॅप्शन नेटकऱ्यांना काही पचली नाही. मग काय तिच्यावर कमेंट्सचा पाऊसच पडला. 

तिने शेअर केलेल्या या फोटोला ‘हे देवा आता मी काय करु...’असे कॅप्शन दिले आहे. तिचे हे कॅप्शन पाहतचा नेटकऱ्यांनी तु अभिनय करणंच सोडून दे... असा सल्ला तिला दिला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये सोनमने शेअर केलेला हा फोटो आणि त्याला दिलेलं कॅप्शन पाहून तिचे चाहतेही तिच्यावर चांगलेच भडकले आहेत.

लॉकडाऊनमध्ये इतर कलाकार मंडळी गरजूंना मदत करत आहेत तर तूही मदत कर.. असे बऱ्याच जणांनी तिला सांगितले आहे. तर काहींनी काय करु हे बोलण्यापेक्षा घरातील कामं कर असंही म्हटलं आहे.सोनमने सोशल मीडियावर एखादा फोटो, व्हिडिओ शेअर करताच त्याला लाखोंनी व्ह्युज मिळतात.

तसेच ती सध्या लॉकडाऊनपूर्वीचे फोटो, व्हिडिओ तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत आहे. तसेच पती आनंद आहुजाबरोबर एकत्रित वेळ ती लॉकडाऊनमध्ये घालवत आहे. मात्र तिची ही नवी पोस्ट पाहून सोनमवर तिचे चाहते नाराज असल्याचंच चित्र पाहायला मिळत आहे.

people anger on this post of sonam kapoor advised to quit acting

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला जय शाह अन् ICC ची भीती! Asia Cup वर बहिष्कार टाकण्याचा विचार सोडला?

Latest Marathi News Updates : पुण्याला पावसाने झोडपलं

Side Effects of Overuse of Antibiotics: प्रतिजैविक औषधांचा अंदाधुंद वापर धोकादायक तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्या परिषदेत विस्‍तृत चर्चा

Barshi Fraud News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष; बार्शीत १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक, तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा

Pune Traffic : शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT