people asked help to sonu sood for catch monkey and send in forest 
मनोरंजन

'आमच्या गावात माकड आलंय, सोनू मदत कर'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - प्रसिध्द अभिनेता सोनु सूद हा केवळ त्याच्या अभिनयासाठी प्रसिध्द नाही तर तो मदतशील स्वभावासाठीही सर्वांना परिचित आहे. त्यानं यापूर्वी अनेकांना आपल्या सहकार्यशीलतेनं उपकृत केलं आहे. गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे, त्यांच्या अभ्यासासाठी दिव्याची व्यवस्था करणे, पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठीही त्यानं घेतलेली मेहनत सर्वश्रृत आहे. मात्र अनेकदा लोकं मदतीचा अर्थ आपआपल्य़ा सोय़ीनं लावून मोकळे होतात. अशावेळी सोनुला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागले आहे. तो मदत करतो म्हणून कोणी कुठल्याही स्वरुपाची मदतीचा हात त्याच्यापुढे करतात.

ज्यावेळी त्याच्या फॅन्सनं सोनूकडे मदतीचा हात मागितला त्यावेळी सोनु म्हणाला आता एवढचं करणे बाकी होते. लॉकडाऊनमध्ये सोनुनं केलेल्या मदतशील उपक्रमांना मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली होती. लोकांनी सोनुचे कौतूक केले होते. त्याला सोशल मीडियावर मदतीसाठी आवाहन केल्यास तो तातडीनं रिप्लाय करुन गरजवंतांना मदत करतो. असे दिसून आले आहे.

आता त्याच्या फॅनने एक वेगळीच मदत मागितली आहे. त्यामुळे त्याची ती मदतीची याचनाच मोठ्या चर्चेचा विषय झाली आहे. बासु गुप्ता नावाच्या एका सोशल मीडिया वापरकर्त्यानं सोनूकडे मदतीचा हात मागितला आहे. त्यानं लिहिले आहे की, आमच्या गावात माकडांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे सगळे गावकरी त्रस्त झाले आहे. त्या माकडांना घालवण्यासाठी आम्ही नाना प्रकारचे उपाय केले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. आता तूच आम्हाला या संकटातून वाचव अशा प्रकारची विनवणी त्या व्यक्तीनं केली आहे.

जेव्हा सोनूनं ती मदतीची मागणी सोशल मीडियावर वाचली तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. बासुनं आपल्या व्टिटमध्ये लिहिलं आहे की, आमच्या गावात एक माकड आले आहे त्यानं केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही त्या माकडाचा बंदोबस्त करावा. त्याला दूर जंगलात सोडण्यासाठी मदत करावी.  सोनूनं त्या व्यक्तीला उत्तर दिले आहे. तो म्हणाला, आता हेच काम बाकी होते माझ्या मित्रा. सोनूचे ते व्टिट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis Sugarcane Protest : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न; कोल्हापुरात ऊस दरावरून आंदोलन चिघळले, Video

Latest Marathi News Live Update : वरंधा घाटात दुचाकीचा भीषण अपघात; भोर येथील तरुणाचा जागीच मृत्यू

केदार शिंदे घेऊन येतायत सासू-सुनेची जुगलबंदी ! 'मालिकेवर आधारित सिनेमा ?' प्रेक्षकांना पडला प्रश्न

Manohar Shinde:'मनोहर शिंदेंच्या भाजप प्रवेशाची उरली औपचारिकता'; फडणवीसांच्यासमवेत बैठक; काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर भूमिका जाहीर करणार

CA Exam Result:'कोरेगावच्या दिव्याचे सीए परीक्षेत यश';पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवलं, आईने कष्ट करुन मुलीच्या पंखात भरल बळ..

SCROLL FOR NEXT