the family man season 2
the family man season 2  Team esakal
मनोरंजन

'The Family Man 2' बंद करा, सोशल मीडियावर ट्रोलर्सचा राग वाढला...

युगंधर ताजणे

मुंबई - फॅमिली मॅनच्या दुस-या सीझनविषयी (the familty man season 2) प्रेक्षकांमध्ये कुतूहल होते. त्याची उत्सुकताही होती. दोन दिवसांपूर्वी ही मालिका प्रदर्शित झाली. मात्र आता त्याच्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे. त्यात दाखवण्यात आलेल्या तमिळीयन्सच्या संघर्षावरुन वाद टोकाला गेला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर (social media) द फॅमिली मॅन 2 बॅन असा विषय ट्रेडिंग होतना दिसत आहे. यावर त्या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनीही आपआपल्या प्रतिक्रिया देऊन त्यात कुणाच्याही भावना दुखावणार नसल्याची काळजी घेण्यात आल्याचे सांगितले आहे. (people demand to ban manoj bajpayee samantha akkineni web series the family man)

फॅमिली मॅनच्या दुस-या सीझनमध्ये तमिळियन्सच्या संघर्षाला (war of tamiliens) चूकीच्या पध्दतीनं दाखवण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यासगळ्या प्रकारामुळे तमिळ लोकांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ही मालिका प्रदर्शित करण्यापूर्वी निर्माते आणि दिग्दर्शकांनी या गोष्टींचा विचार करायला हवा होता. असेही काही ट्रोलर्सनं लिहिलं आहे.

याबाबत द फॅमिली मॅन 2 मधील प्रमुख अभिनेत्री समंथा अक्कीनेनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देताना म्हणाली होती, फॅमिली मॅनचा हा भाग अशा लोकांसाठी श्रध्दांजली आहे ज्यांनी युध्दामध्ये आपल्या प्राणांची आहूती दिली आहे. तसेच असे लोक जे अद्याप त्या युध्दजन्य आठवणींमध्ये आपले आयुष्य जगत आहेत. मी ज्यावेळी राजीची भूमिका करत होती तेव्हा खूप काळजी घेतली होती. या मालिकेतून कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घेण्यात आली आहे.

द फॅमिली मॅन वरचा लोकांचा राग आता वाढत चालला आहे. त्यात अनेकांनी या मालिकेमुळे आपल्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. यामुळे मालिकेच्या निर्मात्यांनी माफी मागावी आणि ही मालिका बंद करावी अशी मागणीही यावेळी काहींनी केली आहे. सध्या फॅमिली मॅनचा सीझन 2 आणि त्याचा वाद ट्रेंडिंगचा विषय ठरताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT