mallika sheravat
mallika sheravat 
मनोरंजन

मल्लिका शेरावतला गाडीमध्ये पाहून रस्त्यावर अशी जमा झाली चाहत्यांची गर्दी.. पाहा व्हिडिओ

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह आहे. ती दररोज तिच्या कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांना अपडेट ठेवत असते. आता अभिनेत्री मल्लिका शेरावत एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

मल्लिकाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये स्वतः मल्लिका गाडीत बसलेली दिसतेय. आणि तिच्या गाडीभोवती भरपूर गर्दी जमा झाली आहे. मल्लिका शेरावतला गाडीमध्ये पाहून लोक रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात आणि तिचे फोटो काढायला लागतात. तिच्या चाहत्यांच्या या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक व्हायला सुरुवात होते. गाडीमधून चाहत्यांचा व्हिडिओ काढत असल्याचं पाहून तिचे चाहते यावर रिऍक्शन देखील देताना दिसत आहेत. 

बॉलीवूडमध्ये मल्लिका शेरावत 'जीना सिर्फ मेरे लिये', 'मर्डर', 'बचके रहना रे बाबा', 'गुरु', 'वेलकम', 'दशावतारम', 'हिस्स', 'डबल धमाल' सारख्या सिनेमांसाठी ओळखली जाते. अभिनेत्री मल्लिका शेरावतने  हरियाणामधील रोहतकमधून तिच्या शालेय शिक्षणाची सुरुवात केली. त्यानंतर ती मिरांडा हाऊस, दिल्ली युनिवर्सिटीमधून फिलॉसॉफीमध्ये डिग्री मिळवली.

मल्लिका भारतातील पहिली अभिनेत्री आहे जिने जॅकी चॅन यांच्यासोबत काम केलं आहे. तिने सिनेमांमध्ये तिचं नाव रिमा ऐवजी मल्लिका ठेवलं जेणेकरुन इतर रिमा नावाच्या अभिनेत्रींमध्ये आणि तिच्यामध्ये लोकांनी गल्लत करु नये. शेरावत हे तिच्या आईचं आडनाव आहे. तिने 'जीना सिर्फ मेरे लिये' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये एंट्री केली मात्र 'मर्डर' या सिनेमाने तिला खरी ओळख मिळवून दिली.  

people starts takes photo after mallika sherawat seeing in car video viral on internet

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT