Phone Bhoot: Trailer Of Katrina Kaif's Film To Release On This Date Google
मनोरंजन

Phone bhoot: कतरिनाच्या 'फोन भूत' चित्रपटाचा ट्रेलर 'या' दिवशी होणार रिलीज, जाणून घ्या तारीख

विकी कौशल सोबत लग्नबंधनात अडकल्यानंतर कतरिना पहिल्यांदाच चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Katrina Kaif: लग्नानंतर कतरिना कैफ पुन्हा एकदा चित्रपटा मध्ये येण्यास सज्ज झाली आहे. काही महिन्यांपूर्वी कॅटचा 'फोन भूत' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आजच्या पिढीतील प्रतिभावान कलाकार सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर या चित्रपटात बॉलिवूडच्या सुपरस्टार्ससोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहेत.(Phone Bhoot: Trailer Of Katrina Kaif's Film To Release On This Date)

कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर एकत्र फोन भूत या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या तिघांना रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. गुरमीत सिंग दिग्दर्शित बहुप्रतिक्षित असा हा चित्रपट या वर्षी ४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्या शिवाय या चित्रपटात जॅकी श्रॉफ, शीबा चड्ढा आणि निधी बिश्त यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत. आता फोन भूतचे नवीन पोस्टर शेअर करण्यात आले आहे, ज्यामध्ये चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार हे लिहिले आहे.

हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. फोन भूतचा ट्रेलर १० ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. त्याचे कॅप्शन लिहिले आहे, 'इनकमिंग कॉल... फोन भूतचा ट्रेलर १० ऑक्टोबरला रिलीज होणार आहे'. पोस्टर शेअर करताना, सिद्धांतने लिहिले – 'थ्रिल सुरू होणार आहे…सर्व फोन वाजतील कारण 'फोन भूत'चा ट्रेलर १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल'. त्याचवेळी ईशाननेही पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये तिघेही वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT