pirates of Caribbean actor Johnny Depp say awkward kissing 21 year old Keira Knightley  
मनोरंजन

जॉनीनं 20 वर्षे छोट्या किराला किस केलं; पायरेट्स ऑफ कॅरिबियनची वेगळी गोष्ट 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - पायरेट्स ऑफ कॅरिबियन सिनेमा कुणाला माहिती नाही अशी शक्यता कमीच आहे. जगातील अनेक प्रमुख भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचा प्रत्येक भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यात जॅक स्पॅरोची प्रमुख भूमिका करणा-या जॉनीचा या चित्रपटाच्या वेळचा वेगळाच अनुभव आहे. या चित्रपटांतून त्याची जॅक स्पॅरो नावाची व्यक्तिरेखा कमालीची लोकप्रिय झाली होती. जॉननं सोशल मीडियावर त्याचा पायरेट्स ऑफ कॅरेबियनच्या वेळचा एक अनुभव शेयर केला आहे.

जॉनीनं पायरेट्स ऑफ कॅरिबियनच्या डेड मेस चेस्ट या भागात किरा नाईटलीला पहिल्यांदाच किस केलं होतं. त्यावेळी किरा ही फक्त 21 वर्षांची होती. जॉनीपेक्षा 20 वर्षांनी लहान. एका मुलाखतीच्या वेळी जॉनीला त्यावरुन एक प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यानं तो अनुभव सांगितला. जॉनी हा हॉलिवूडमधला एक प्रसिध्द कलाकार आहे. तो त्याच्या एंबर हर्ड नावाच्या पत्नीबरोबरील घटस्फोटामुळे चर्चेत राहिला आहे. जॉनीचे नाव हे वेगवेगळया अभिनेत्रींबरोबर जोडले गेले होते. त्यात अँजेलिना जोली, मेरियन कॉर्टिलार्ड आणि किरा नाईटलीचा समावेश आहे. मात्र यासगळ्याचा जॉनीनं स्वीकार केलेला नाही. त्यावर त्यानं शांत राहणे पसंत केले आहे.  जी नावे घेतली गेली त्या प्रत्येक अभिनेत्रीला त्याने डेट केले आहे. त्याची ती मुलाखत मात्र चर्चेत राहिली याचे कारण म्हणजे किराला विचारलेला किस संबंधीचा प्रश्न.

जॉनी आणि किरा यांनी 2006 मध्ये पायरेट्स ऑफ कॅरिबियन, डेड मॅन्स चेस्ट नावाच्या चित्रपटात काम केले होते. त्यावेळी त्यानं किरा सोबत एक किसिंग सीन दिला होता. त्याबाबत जॉनीनं सांगितले की, तो एक वेगळा अनुभव होता. याचे कारण म्हणजे किरा माझ्यापेक्षा फार लहान होती. आमच्यात 20 वर्षांचे अंतर होते. जेव्हा असा एखादा प्रसंग येतो तेव्हाची परिस्थिती फारच वेगळी असते. हे काही शब्दांत सांगता येणार नाही. ती लहान असल्यानं त्यावेळचा प्रसंग वेगळाच होता.असे जॉनीनं सांगितले.

अनेकांना माहिती असेल की, जॉनीची पूर्वपत्नी एंबर हर्ड ही किरा पेक्षा एका वर्षानं छोटी आहे. एकीकडे जॉनीला किराला किस करणे वेगळं वाटलं असेल. मात्र किराला तसे काही वाटले नाही. तिनंही एका मुलाखतीत हा अनुभव शेयर केला होता. ती म्हणाली होती, मला त्यावेळी जॉनी याच्याशिवाय ऑरलेंडो ब्लूमलाही किस करायचे होते. यापेक्षा आणखी काय चांगले असू शकते. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar : माझ्या मुलीसारखी, पण चुकी झाली! एकटीला पाहून भररस्त्यात छेड काढली, तरुणीनं धडा शिकवताच धरले पाय

Pune Metro : 'कारशेड'साठी जागाच नाही! पुणे मेट्रोच्या चौथ्या टप्प्यात मोठा अडथळा; CWPRS ने प्रस्ताव फेटाळला

Jayant Patil vs Gopichand Padalkar : ‘...राव तेवढा ढापलेला कारखाना परत द्या’ भर चौकात लावला पोस्टर, जयंत पाटील, गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद टोकाला

काठीला कापड गुंडाळल्यासारखी दिसते... बारीक असल्याने 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीला हिणवलं; अनुभव सांगत म्हणाली-

Pune Redevelopment : लोकमान्यनगरचा पुनर्विकास राजकीय आणि 'म्हाडा'च्या हस्तक्षेपामुळे थांबला! नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT