planet marathi ott new marathi Web Series Compass muhurt shoot sharts from today sakal
मनोरंजन

Compass Web Series: कलाकारांची फौज घेऊन येतेय 'कंपास'.. काय आहे प्रकरण?

प्लॅनेट मराठीच्या 'कंपास'चा मुहूर्त संपन्न..

नीलेश अडसूळ

Compass Web Series: दर्जेदार, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, लघुपट, सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेबसीरिज असा मनोरंजनाचा सर्वोत्कृष्ट खजिना दिल्यानंतर आता नवीन वर्षात नवीन कॉन्टेन्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास प्लॅनेट मराठी सज्ज झाले आहे. वर्षाची सुरुवात प्लॅनेट मराठी सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'कंपास' या वेबसीरिजने करणार आहे.

नुकताच या वेबसीरिजचा मुहूर्त सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी उर्मिला कानेटकर - कोठारे, सायली संजीव, ऋतुजा बागवे, पौर्णिमा डे, खुशबू तावडे, सुयश टिळक, संग्राम साळवी, सौरभ गोखले, धवल पोकळे, राजेंद्र शिसतकर, गिरीश जोशी, आनंद इंगळे, संजय मोने यांच्यासह निर्माते अक्षय बर्दापूरकर आणि संतोष रत्नाकर गुजराथी उपस्थित होते.

हेही वाचा: प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "नवीन वर्षाची सुरुवात आम्ही 'कंपास' या वेबसीरिजच्या चित्रीकरणापासून करत आहोत. 'कंपास' हा खूप वेगळा विषय असून यात कसलेल्या कलाकारांची दमदार फळी आहे. 'कंपास' हे नावाच खूप अपिलिंग असून यात प्रेक्षकांना काहीतरी जबरदस्त क्राईम थ्रिलर पाहायला मिळणार आहे.''

दिग्दर्शक सुश्रुत भागवत म्हणतात, " नवीन वर्षात प्लॅनेट मराठी सोबत नव्यानं पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळणे, ही खूपच आनंदाची बाब आहे. 'कंपास' ही एक क्राईम थ्रिलर आहे, यापेक्षा अधिक मी काहीही सांगणार नाही, हां एवढं मात्र नक्की की अशी वेबसीरीज या आधी मराठीत तुम्ही पाहिली नसेल.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT