Actor Mihir Das 
मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेते मिहिर दास यांचं निधन; पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

स्वाती वेमूल

ओडिया सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिहिर दास (Mihir Das) यांचं मंगळवारी (११ जानेवारी) निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. महिनाभरापूर्वी त्यांना हृदविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना कटकमधील (Cuttack) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होती, मात्र ते उपचारांना प्रतिसाद देत होते. दास हे गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि त्यांना डायलिसिससाठी नियमित रुग्णालयात जावं लागत होतं. प्रकृती खालावल्यानंतर दास यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला.

ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा इथं जन्मलेल्या मिहिर दास यांनी ओडिया आर्ट फिल्म स्कूल मास्टरमधून अभिनयात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी 'मथुरा बिजय'मध्ये (1979) काम केलं. लक्ष्मी प्रतिमा (1998) आणि फेरिया मो सुना भाऊनी (2005) मधील अभिनयासाठी त्यांना राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. मु ताटे लव करुची (2007) या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा पुरस्कार मिळाला. मिहिर यांच्या पश्चात पत्नी संगीता दास आणि मुलगा अमलान दास असा कुटुंब आहे. मिहिर यांचा मुलगा अमलानसुद्धा ओडिया चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

'नामांकित ओडिया अभिनेते मिहिर दास यांच्या निधनाच्या वृत्ताने अतीव दु:ख झालं. चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांना आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. ओम शांती,' असं ट्विट पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT