Police complaint filed against actor Prakash Raj over tweet on Chandrayaan-3  SAKAL
मनोरंजन

Prakash Raj: चांद्रयान-३ ची खिल्ली उडवणं प्रकाश राज यांना भोवणार, हिंदू संघटनेने केली तक्रार दाखल

अभिनेते प्रकाश राज यांनी चांद्रयान-3 बाबत केलेल्या ट्विटवरून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे

Devendra Jadhav

Mission Chandrayaan 3 : अभिनेते प्रकाश राज यांनी चांद्रयान-3 बाबत केलेल्या ट्विटवरून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी पोलीस ठाण्यात हिंदू संघटनांच्या नेत्यांनी ही तक्रार दाखल केली होती.

हिंदू महासंघटनेने केली तक्रार दाखल

चांद्रयान-3 संदर्भात प्रकाश राज यांच्या या पोस्टपासून नेटकरी त्यांना सोशल मीडियावर सतत ट्रोल करत आहेत. अनेकांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केलीय.

आता देशातील हिंदू संघटनांच्या नेत्यांनी अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली असून प्रकाश राज यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रकाश राज यांचं आक्षेपार्ह्य ट्विट

देशात वेगवेगळ्या ठिकाणी चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरच्या सुरक्षित लँडिंगसाठी विशेष प्रार्थना केल्या जात आहेत. यादरम्यान प्रकाश राज यांनी ट्विटर वर इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचे चहा ओततानाचे एक व्यंगचित्र असलेली पोस्ट शेअर केली होती. या पोस्टला त्यांनी कॅप्शन देखील दिलं असून यामध्ये "ब्रेकिंग न्यूज:- विक्रम लँडरकडून चंद्रावरील पहिला फोटो येत आहे. वॉव" असं म्हटलं आहे.

प्रकाश राज हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात मात्र त्यांनी चांद्रयान ३ ची देखील खिल्ली उडवल्याने नेटकरी चांगलेच संतापले आहेत. अनेकांनी प्रकाश राज यांच्या या ट्वीटला उत्तरे दिली आहेत.

वाद ओढवल्यानंतर प्रकाश राज यांचं स्पष्टीकरण

आता प्रकाश राज यांनी आपल्या त्या ट्विटवरुन प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "तुम्हाला जर माझ्या त्या बोलण्यातील विनोद कळला नसेल तर तुम्हीच खरचं चंद्रावर आहात. मी त्या ट्विटमधून हॅशटॅग आर्मस्ट्राँग च्यावेळचा विनोद शेयर केला आहे. यामध्ये मला ज्यांनी ट्रोल केले त्यांना नेमका कोणता चहावाला दिसला हे मला माहिती नाही. तुम्हाला मी काय म्हणालो हेच कळले नाही", असे प्रकाश राज यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: ठाकरेंच्या शिलेदारांचा महायुतीशी सामना, मुंबईत दुरंगी सामने अटीतटीचे ठरणार; कोण-कुठे लढणार?

Ruturaj Gaikwad: 'ऋतुराजला संधी तेव्हाच मिळेल, जेव्हा विराट आणि रोहित वनडेत...', R Ashwin नेमकं काय म्हणाला?

Election: निवडणूक की सत्तेचा सौदा? मतदारांचा विश्वास तुटतोय, मतदान टक्केवारी कमी होणार? मनपा निवडणुकांपूर्वीच प्रश्नचिन्ह

Angarki Sankashti Chaturthi 2026: अंगारकी चतुर्थीला करा 'हे' उपाय, भगवान गणेशाच्या आशीर्वादाने संपत्तीत होईल वाढ

Attack on US Vice President Residence : मोठी बातमी! अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स यांच्या वॉशिंग्टनमधील घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT