मनोरंजन

Video; 'असेल जिद्द तर होईल सिद्ध', पोलीस कर्मचाऱ्यानं घडवली बाप्पाची मूर्ती

युगंधर ताजणे

मुंबई - पोलिसाची ड्युटी काय असते हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. वेळेवर कामावर हजर झालं तरी ठरलेल्या वेळेत आपण घरी जाऊ याची काही शाश्वती नसते. दरम्यान कोरोनच्या काळात मोठी जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर होती. त्यांना वेगवेगळ्या संकटांचा सामनाही करावा लागला. अशावेळी आपले छंद, आवड यांच्यासाठी वेळ काढणं अवघड होऊन बसतं. गेल्या २४ वर्षांपासून आपण श्रींची मूर्ती बनविण्याचं काम करतो आहे. त्यासाठी कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही. रात्री कामावरून आलं की पहाटे तीन ते चार वाजेपर्यत मूर्ती तयार करण्याचं काम करत बसायंच. हा आजवरचा नियम आहे. तो गेल्या इतक्या वर्षात मोडलेला नाही. पुण्यातील रविवार पेठेतील पोलीस कर्मचारी गणेश तुर्के गणेशोत्सवाच्या आठवणी सांगताना हरखून जातात.

विश्रामबाग पोलीस चौकीत हवालदार म्हणून गणेश रामदास तुर्के कार्यरत आहेत. त्यांनी जेव्हापासून घरात गणरायाची स्थापना करण्यास सुरुवात केली तेव्हापासून ती मूर्ती ते स्वत: बनवतात. त्यासाठीची सगळी तयारी करतात. त्यांनी मूर्ती बनविण्याचं कोणतही प्रशिक्षण घेतलेलं नाही. तरीही त्यांनी तयार केलेली मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेते. एखाद्या चांगल्या कलाकाराला अवाक होण्यास भाग पाडणारी कलाकृती गणेशजी त्यांच्या कलेतून साकारतात. आपली ड्युटी सांभाळून ते श्रींची सेवा करतात. आपल्याला हे काम वाटत नाही. जेव्हा रात्री कामावरून घरी येतो तेव्हा पहाटेपर्यत मूर्ती बनविण्याचं काम करत असल्याचे ते सांगतात.

पर्यावरण पूरक मूर्ती बनविण्यावर भर गणेश तुर्के यांचा असतो. त्यांनी नेहमीच शाडूच्या मातीचा गणपती तयार करण्यास प्राधन्य दिलं आहे. त्यासाठी त्यांना घरातून प्रोत्साहन मिळालं आहे. त्यांची पत्नी, आई, मुलं हेही त्यांना मूर्ती बनविण्यासाठी मदत करतात. एक पोलीस कर्मचारी आणि कलावंत हे समीकरण तसं फारसं जुळत नाही. मात्र ती कला गणेश यांना जमली आहे. आपल्यातील मुर्तीकार कसा घडला, याविषयी त्यांनी सांगितलं की, मी जेव्हा दहा वर्षांचा होतो तेव्हा माझ्या शेजारी राहणारे एक गृहस्थ घरीच गणपती तयार करत असल्याचे मी पाहिले. तेव्हापासून आपणही घरीच गणपती तयार करायचा असं ठरवलं. सुरुवातीला काही अडचणी आल्या. आपल्या हवा तसा आकार त्या मूर्तीला येत नव्हता. अनेकदा लेप, रंग, आकार, त्याची कलाकुसर यात संगती येत नसे. तेव्हा निराश व्हायला व्हायचं पण, जिद्द सोडली नाही, काहीही झालं तरी आपण घरीच गणरायाची मूर्ती तयार करायची. हे ध्येय कायम होतं. आणि ते अजूनही आहे.

माझ्या शेजारी राहणारे ते गृहस्थ प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवत असत. मी त्यांच्याकडे जायचो आणि ते कसे काम करतात याचं निरिक्षण करायचो. यातून मला खूप काही शिकायला मिळालं. मी त्यांना मला हे काम शिकवाल का अशी एकदा विनंतीही केली होती. मात्र त्यांनी मला नकार दिला. त्यानंतर आपणच आपलं शिकू ही खूणगाठ मनाशी बांधली. आणि काम सुरु केलं. आता बऱ्यापैकी मी मूर्ती तयार करु शकलो आहे. त्याचं सारं श्रेय हे माझ्या जिद्दीला आहे. मात्र हे सारं काही एका रात्रीत झालं नाही. त्यासाठी मला अनेकदा अपयश आलं. कित्येक मुर्ती मला पुन्हा तयार कराव्या लागल्या. पण सर्वोत्कृष्ठतेचा ध्यास मी काही सोडला नाही. अशी आठवण सांगताना गणेश तुर्के हळवे झालेले दिसून येतात.

त्यांनी आतापर्यत वेगवेगळ्या प्रकारच्या गणेशाच्या मूर्ती साकारल्या आहेत. त्यात दगडूशेठ गणपतीची मुर्ती, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रुपातील गणेश, भगवान कृष्णाच्या प्रतिमेची गणरायाची मुर्ती त्यांनी आजवर तयार केल्या आहेत. यंदा त्यांनी गरुडरथावर विराजमान झालेले गणराज साकारले आहेत. त्यासाठी काही आठवड्यांपासून त्यांनी मेहनत घेतली आहे. गणरायाच्या उत्सवाला काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला की, आपण बाजारात फेरफटका मारतो. त्यावेळी वेगवेगळ्या आकाराच्या, रंगाच्या मूर्ती पाहायला मिळतात. यंदा बाजारात कोणत्या मूर्तीला भाविकांची पसंती आहे हे त्यानिमित्तानं पाहायला मिळतं. त्यानंतर आपण मूर्ती करायला सुरुवात करतो. हेही गणेश यावेळी आवर्जुन सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT