sandeep nahar 
मनोरंजन

अभिनेता संदीप नाहरची हत्या की आत्महत्या? पोलीस म्हणतात..

स्वाती वेमूल

'एम. एस. धोनी' आणि 'केसरी' चित्रपटात भूमिका साकारलेला अभिनेता संदीप नाहरच्या संशयास्पद मृत्यूने कलाविश्वात खळबळ उडाली. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत संदीपने त्याच्या पत्नीवर भांडणाचे आणि मानसिक त्रासाचे आरोप केले होते. त्याची हत्या आहे की आत्महत्या याविषयी जोरदार चर्चा सुरू असताना आता पोलिसांनी या घटनेवर स्टेटमेंट सादर केलं आहे. संदीपने त्याच्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

काय म्हणाले पोलीस?
संदीपने त्याच्या बेडरुमचं दार आतून बंद केलं होतं. पत्नीने वारंवार दार ठोठावूनही आतून काहीच उत्तर आलं नाही. तेव्हा कंचनने घर मालकाला आणि संदीपच्या मित्रांना फोन करून बोलावलं. त्यानंतर जेव्हा दार उघडण्यात आलं, तेव्हा संदीप पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. संदीपला गोरेगावमधल्या रुग्णालयात दाखल केलं असता तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मंगळवारी संदीप नाहरचा भाऊ आणि वडील त्याच्या मृतदेहावर दावा करण्यासाठी गोरेगाव पोलीस ठाण्यात आले. मात्र अद्याप कोणीही तक्रार दाखल केली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

प्राथमिक माहितीच्या आधारावर गोरेगाव पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सध्या पोलीस संदीपच्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी संदीपच्या पत्नीचाही जबाब नोंदवून घेतला आहे. 

काय आहे प्रकरण?
संदीपने मृत्यूपूर्वी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत पत्नीसोबत असणारे मतभेद सांगितले होते. "मला तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. एम. एस धोनी चित्रपटात मी छोटू भैय्याची भूमिका साकारली होती. मी सध्या मानसिकदृष्ट्या स्थिर नाही आणि याला कारणीभूत माझी पत्नी कंचन शर्मा आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून मी हा त्रास सहन करतोय. आमची सतत भांडणं होत आहेत. आता हे सर्व माझ्या सहनशक्तीपलीकडे गेलंय. माझी पत्नी आणि आई यांनी मला कधीच समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही", असं तो या व्हिडीओत म्हणाला होता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT