Nitesh Pandey Death Esakal
मनोरंजन

Nitesh Pandey Death: हॉटेल रुममध्ये बेशुद्धावस्थेत सापडला होता नितेश! पोलिस म्हणतायत...

Vaishali Patil

Nitesh Pandey Death: अनेक टीव्ही मालिकांमधून लोकांना हसवणाऱ्या आणि सगळ्यांचे मनोरंजन करणाऱ्या नितेश पांडेनी सर्वांनाच धक्का दिला. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर इंडस्ट्रीत शोककळा पसरली . टीव्हीच नव्हे तर चित्रपटांमधुन लोकप्रिय झालेल्या नितेश यांचा इगतपुरी येथील हॉटेलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

त्यांनी 51वर्षी शेवटचा श्वास घेतला. त्याच्या निधनामुळे मनोरजंन विश्वात शोककळा पसरली आहे. दरम्यान पोलिसांनी नितेश पांडे यांच्या मृत्यूबाबत एक अधिकृत निवेदन जारी केले आहे.

नितेश पांडे यांच्या मृत्यूबाबत माहिती देतांना पोलिसांनी जाहिर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नितेश पांडे हे इगतपुरीतील हॉटेल ड्यू ड्रॉप मध्ये मंगळवारी सकाळपासून थांबले होते.त्यानी संध्याकाळी जेवणाची ऑर्डर दिली होती.

मात्र जेव्हा वेटरने ऑर्डर देण्यासाठी त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला तेव्हा त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे तेथील स्टाफपैकी एकाने मास्टर चावीनं दरवाजा उघडला. ते आत गेले असता त्यांना नितेश पांडे आत बेशुद्ध पडलेले दिसले. जेव्हा त्यांना तातडिने इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी नितेशला मृत घोषित केले.

या प्रकरणाचा पुढील तपास इगतपुरी पोलीस करत आहेत. सध्या पोलीस नितेश पांडेच्या पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. पोलिस हॉटेलमधील कर्मचारी आणि जवळच्या नातेवाईकांचीही चौकशी करण्यात येत आहे.

90 च्या दशकाच्या सुरुवातीस थिएटरमध्ये करिअरला सुरुवात करणाऱ्या नितेश यांनी छोट्या पडद्यापासून तर मोठ्या पडद्यापर्यंत त्याच्या अभिनयानं वेगळीच ओळख निर्माण केली.

नितेश पांडे यांनी 1990 मध्ये थिएटरमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. 1995 मध्ये, 'तेजस' नावाच्या शोमध्ये त्यांना पहिला ब्रेक मिळाला, ज्यामध्ये त्यानी गुप्तहेराची भूमिका केली होती.

यानंतर त्यानी 'मंजिलें अपनी अपनी, अस्तित्व...एक प्रेम कहानी', 'साया', 'जस्तजू', 'दुर्गेश नंदिनी' आणि 'अनुपमा' सारख्या शोमध्ये काम केले.

यासोबतच चित्रपटांमध्ये 'ओम शांती ओम', 'बधाई दो', 'रंगून', 'हंटर', 'दबंग 2', 'बाजी', 'मेरे यार की शादी है', 'मदारी' आणि 'खोसा का घोसला' यांसारख्या इतर अनेक चित्रपटांच्या माध्यमातुन त्यांनी प्रेक्षकांच मनोरंजन केले. याशिवाय त्यांचे ड्रीम कॅसल प्रोडक्शन नावाचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे, जे रेडिओ शो तयार करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT