Polish city names square Harivansh Rai Bachchan
Polish city names square Harivansh Rai Bachchan 
मनोरंजन

पोलंडमधील एका चौकाला हरिवंशराय बच्चन यांचे नाव

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - देशातील सर्वाधिक प्रभावी व्यक्तिमत्व कोण, याविषयी एका संस्थेने सर्वेक्षण केले. त्यातून बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली. त्यांच्या चाहत्यांनी याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. एकीकडे अमिताभ बच्चन यांच्या नावाचा गौरव होत असला तरी दुसरीकडे अमिताभ यांचे वडील हिंदी साहित्य जगतातील ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन यांचाही सातासमुद्रापार सन्मान करण्यात आला आहे.

हरिवंशराय बच्चन यांचे नाव पोलंडमधल्या एका चौकाला देण्यात आले आहे. यात विशेष बाब म्हणजे यापूर्वीही त्यांच्या नावाचा सन्मान या देशाने केला होता. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात पोलंडच्या एका चर्चमध्ये डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली होती. बिग बी येथील लोकांचे प्रेम बघून अतिशय भावूक झाले होते. बच्चन यांनी त्या प्रार्थनेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

पोलंडने केलेल्या या गौरवामुळे बिग बी कमालीचे भारावून गेले आहेत. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोलंडचे आभार मानले आहे. ते म्हणाले, ‘पोलंडमधील व्रोक्लाव शहरातील एका चौकाचे नामकरण करण्यात येणार असून, बाबूजींचे नाव त्याला दिले जाणार आहे. दस-याच्या निमित्ताने यापेक्षा दुसरी मोठी भेट असूच शकत नाही. कुटुंब, व्रोक्लाव येथील भारतीय समुदाय आणि भारतासाठी हा अभिमानाचा क्षण. आहे. जय हिंद’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

बिग बींनी ट्विटरवर लिहिले आहे की, ”प्रबिसि नगर कीजे सब काजा. हृदयं राखि कोसलपुर राजा’...रामचरितमानस , सुंदर कांड. भावार्थ – अयोध्यापुरीचे राजा श्री रघुनाथजी यांना हृदयात ठेवून नगरात प्रवेश करा. तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होतील.” अशा आशयाचे ट्विट करुन अमिताभ बच्चन यांनी या सन्मानासाठी पोलंड सरकारला मनपूर्वक धन्यवाद दिले आहेत. बिग बींनी आपल्या पोस्टमध्ये लिहितात,  'यूरोपमधील सर्वात जुन्या चर्चपैकी एक. पोलंडमध्ये बाबूजींसाठी प्रार्थना झाली. मनाला स्पर्श करणारा क्षण. त्यांच्या आत्म्याला नक्कीच शांती आणि प्रेम मिळेल. या सन्मानासाठी सर्वांचे धन्यवाद', असे ते म्हणाले होते.

बिग बी सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यांनी ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. नुकतीच त्यांनी एक पोस्ट करत, पोलंड देशातील एका चौकाला वडील हरिवंश राय बच्चन यांचे नाव दिले जाणार असल्याचे सांगितले आहे.


 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : एचडी रेवण्णाला 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT