Political Leaders Condoled the death of comedian Raju Srivastava Google
मनोरंजन

Raju Srivastava Death: 'कलाक्षेत्राचं मोठं नुकसान', राजकीय नेत्यांनी व्यक्त केला शोक

अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर २१ सप्टेंबर २०२२ रोजी कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मालवली.

प्रणाली मोरे

Raju Srivastava Death:प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत अखेर आज 21 सप्टेंबर,2022 रोजी मालवली. अनेक दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली पण ती अपयशी ठरली. कॉमेडियनच्या जाण्यानं राजकीय क्षेत्रातून देखील शोक व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबाच्या दुःखात आपण सामील आहोत,ईश्वर त्यांना या दुःखातून बाहेर येण्याचं बळ देवो असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त केली आहे. (Political Leaders Condoled the death of comedian Raju Srivastava)

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ट्वीटरवर एक पोस्ट करत त्यात लिहिलं आहे,''सुप्रसिद्ध हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांचा आपला असा एक खास अंदाज होता, त्यांनी आपल्या अद्भूत प्रतिभेनं सर्वांनाच प्रभावित केलं होतं. त्यांच्या निधनानं कला जगताचं मोठं नुकसान झालं आहे. मी त्यांच्या कुटुंबाच्या आणि त्यासोबतच त्यांच्या चाहत्यांच्या दुःखात सामिल आहे. ईश्वर त्यांना या दुःखातून बाहेर येण्याची शक्ती देवो. ओम शांती शांती''.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देखील राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ट्वीट करत त्यांनी लिहिलं आहे,''सुप्रसिद्ध विनोदी कलाकार,राजू श्रीवास्तव यांच्या निधनानं मला दुःख झाले आहे. ते अभिनयात मुरलेले कलाकार होतेच पण त्याहून अधिक त्यांचे व्यक्तीमत्त्व दिलखुलास होते. सामाजिक क्षेत्रात देखील ते सक्रिय होते. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती...''

तसंच समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं आहे. ते म्हणाले आहेत की,''राजू श्रीवास्तव आता आपल्यामध्ये राहिले नाहीत हे ऐकल्यावर खूप दुःख झाले. खूप गरीब कुटुंबातून ते होते,पण आपली मेहनत,जिद्द,चिकाटीच्या बळावर संघर्षाशी सामना करत त्यांनी आपली देश-परदेशात एक ओळख निर्माण केली होती. असं टॅलेंट असलेले लोक खूप कमी जन्माला येतात. राजू श्रीवास्तव एवढे मोठे कलाकार होते पण त्यांचे राहणीमान खूप साधे होते''.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लिहिलं आहे की,''प्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर मला खूप दुःख झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि देवाच्या चरणी त्यांना स्थान मिळो. या दुःखाच्या क्षणी मी त्यांच्या कुटुंबाच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सामिल आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT