prakash raj news releted narendra modi 
मनोरंजन

'पेट्रोल डिझेल दरवाढ; 'जनतेलाही तेच कटू सत्य सांगायचे आहे का?'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - सीपीआई नेता सीताराम येचूरी यांनी वाढत्या बेरोजगारीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. त्यानंतर त्यांच्या प्रतिक्रियेला प्रख्यात अभिनेते प्रकाश राज यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की, सध्याची परिस्थिती पाहता त्यावर तातडीनं उपाययोजना शोधावी लागेल. सध्या कॉमन मॅन मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे त्याचापुढील संकटे कमी करायची असल्यास काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. अशी प्रतिक्रिया सीताराम येचूरी यांनी दिली होती. त्यावर प्रकाश राज यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. त्यात होणारी वाढ यामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविषयी सीताराम येचूरींनी सरकारवर टीका केली आहे. लोकांचा रोजगार हिरावण्याचे काम सरकारनं केलं आहे. ज्यावेळी येचूरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यावर प्रकाश राज यांनी लोकांनाही तसेच विचारायचे असेल. असे म्हटले आहे. अशाच प्रकारचे कटू सत्य आता जनतेला विचारायचे आहे का, असा प्रश्न राज यांनी विचारला आहे.

सीताराम येचुरी यांच्या ट्विटला प्रत्युत्तर म्हणून प्रकाश राज यांनी केलेलं व्टिट सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. त्यावर लोकं मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटही करताना दिसत आहे. येचुरी यांनी आपल्या व्टिटमध्ये लिहिले आहे की, पेट्रोल आणि डिझेल यांच्यावरील एकुण खर्च हा 52 हजार 537 कोटी रुपये होता. तो आता वाढून 2020 आणि 2021 मध्ये तीन लाख कोटी रुपये एवढा झाला आहे. लोकांचे रोजगार हिरावून घेत त्यांच्यापुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रकाश राज यांनी असे म्हटले आहे की, हेच तर कटू सत्य आहे. जे देशाचे नागरिक सांगु पाहत आहेत. जेव्हा फेब्रुवारी मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली वाढ डोकेदुखी ठरत आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा भाव 91.27 रुपये तर डिझेलचा 81.47 रुपये एवढा आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात पेट्रोल हे 4.87 तर डिझेल 4.99 रुपयांनी वाढले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

Kaygaon News : शेतकरी पुत्राची गरुड भरारी, धनगरपट्टीच्या शुभम खैरेची नगरपरिषद अधिकारीपदी निवड

Pune Ganeshotsav : दोन वर्षांपासून सहभागी मंडळांनाच यंदा मिरवणुकीत प्रवेश; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

SCROLL FOR NEXT