ponniyin selvan 2 song
ponniyin selvan 2 song Sakal
मनोरंजन

PS-2 Anthem Song: 'PS-2' चे अँथम सॉंग झाले रिलीज, एआर रहमानच्या आवाजानं जिंकली चाहत्यांची मनं

Aishwarya Musale

साऊथ चित्रपटसृष्टीतील दिग्गज चित्रपट निर्माते मणिरत्नम त्यांचा लोकप्रिय चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन'चा भाग-2 घेऊन येत आहेत. लवकरच 'पोन्नियिन सेल्वन 2' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी, 'पोन्नियिन सेल्वन 2' चे लेटेस्ट अँथम गाणे लाँच करण्यात आले आहे.

PS-2 चे हे अप्रतिम गाणे ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते गायक ए आर रहमान यांनी आपल्या सुंदर आवाजात गायले आहे. रिलीज होताच 'पोन्नीयिन सेल्वन 2'चे हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे.

शनिवारी, निर्मात्यांनी 'पोन्नियिन सेल्वन 2' च्या अँथम सॉंगच्या संदर्भात एक इव्हेंट आयोजित केला होता. यादरम्यान पीएस-2 चे अँथम लाँच करण्यात आले आहे. 'पोन्नियिन सेल्वन 2' चे हे गाणे हिंदीत प्रसिद्ध गायक ए आर रहमान, अरिजित सिंग आणि बेनी दयाल यांनी त्यांच्या सुंदर आवाजात गायले आहे.

रहमानच्या आवाजात PS-2 चे हे नवीनतम गाणे ऐकताना तुम्हाला खरोखर आनंद होईल. एवढेच नाही तर प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

'पोन्नियिन सेल्वन 2' चे हे गाणे हिंदी, तमिळ, तेलगू आणि इतर अनेक भाषांमध्ये रिलीज झाले आहे. हे गाणे ऐकल्यानंतर 'पोनियिन सेल्वन 2' चित्रपटासाठी उत्सुकता वाढणार आहे. इतकंच नाही तर या गाण्यातील एआर रहमानचा डॅपर लूकही प्रेक्षकांना आवडणार आहे.

'पोन्नियिन सेल्वन 2' च्या या अँथम गाण्याच्या रिलीज कार्यक्रमावेळी विक्रम, कार्ती, जयराम रवी आणि तृष्णा कृष्णन यांसारखे अनेक कलाकार उपस्थित होते. चित्रपटाची कथा थोडी अपूर्ण राहिली असली तरी गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या पोन्नियिन सेल्वनच्या भाग-1 ने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. अशा परिस्थितीत येत्या २८ एप्रिलला चाहत्यांना चित्रपटगृहांमध्ये 'पोन्नियिन सेल्वन २' पाहायला मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT